Early warning signs of kidney damage through eye changes Freepik
लाईफस्टाईल

Kidney Problems Signs : डोळ्यात ही लक्षणं दिसतायंत? किडनीला धोका तर नाही!

Eye Symptoms Indicate Kidney Disease : डोळ्यांत सुज, धुसर दृष्टी किंवा डोळे लाल दिसत आहेत का? ही किडनीच्या आजाराची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. वेळेत लक्ष द्या, आरोग्य सांभाळा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्या शरीरातील पाच ज्ञानेंद्रियांपैकी डोळा हा सर्वात संवेदनशील अवयव आहे. आपण आजारी पडलो कि, त्याचे परिणाम सर्वप्रथम आपल्या डोळ्यांमध्ये दिसतात. जसे कि, जास्त ताप आल्यावर डोळे लाल दिसतात, कावीळ झाली असेल तर डोळे पिवळसर दिसतात, काहीवेळा डोळ्यांना सुजही येते. डॉक्टरसुद्धा तपासणी करताना जिभेसह डोळेही तपासतात. याचप्रमाणे तुमच्या डोळ्यांमध्ये दिसणारी काही लक्षणं किडनीला धोका असल्याचा संकेत देतात. ही लक्षणं कोणती आहेत? पुढे जाणून घेऊया.

बऱ्याचवेळा डोळ्यांना होणाऱ्या समस्या फक्त डोळ्यांशीच संबंधीत नसतात, तर त्या किडनीच्या आरोग्याबाबतही सांगतात. सकाळी उठल्यावर डोळ्यांना सुज येते. झोप जास्त झाली, असं म्हणून याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण ही सुज दिवसभर राहील्यास यावरून तुमच्या किडनीचं आरोग्य धोक्यात असल्याचं समजून येतं. जेव्हा शरीरातील पोषक तत्त्व लघवीद्वारे बाहेर पडू लागतात तेव्हा डोळ्यांना सुज येते. याचा परिणाम तुमच्या किडनीवर होऊ शकतो.

अचानक धुसर दिसणे किंवा डबल विजन हे फक्त डोळ्यांच्या कमकुवततेमुळे होत नाही तर, ही उच्च रक्तदाब तसेच मधुमेहासारख्या आजारांची लक्षणं आहेत. जी किडनीच्या समस्यांशी निगडीत असतात. ज्यांना आधीपासुनच किडनीचे आजार आहेत अशा लोकांच्या डोळ्यात सतत कोरडेपणा असतो व डोळ्यांना खाज येत राहते. शरीरातील खनिजांच्या कमतरतेमुळे असे होते. अशात जर तुम्हाला सतत डोळे चोळावेसे वाटत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.

काहीवेळा आपले डोळे अतिप्रमाणात लाल होतात. हे नेफ्राइटिस सारख्या किडनीच्या गंभीर आजाराचे लक्षण आहे. या आजारामुळे किडनीच्या ऊतींना जळजळ होते आणि सुज येते. ज्यामुळे किडनीला रक्तातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करणे कठीण होते. जर तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यात यापैकी एकही लक्षण जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरीत उपचार सुरू करा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hyperloop Rail: देशातील पहिली हायपरलूप रेल्वे कधी धावणार? जाणून घ्या, नव्या रेल्वेचा मार्ग

Ration Card Holder: राज्यातील 3 हजार रेशन कार्डधारकांना नाही मिळणार रेशन; काय आहे कारण?

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं; मनोज जरांगे समर्थकांकडून बीड जिल्हा बंदची हाक, VIDEO

EPFO 3.0 लाँन्च होण्यास का होतोय विलंब? कोणत्या पाच नियमात होतील बदल? जाणून संपूर्ण माहिती

Horrific : दुहेरी हत्याकांडाने खळबळ; घरगुती वादातून जावयाने केली मायलेकीची हत्या

SCROLL FOR NEXT