Kidney Health ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Kidney Health: हात-पाय सतत सूजतात? असू शकते किडनी खराब, ही लक्षणे दिसातच व्हा सावध

कोमल दामुद्रे

Kidney Disease :

हिवाळ्यात आपण कमी प्रमाणात पाणी पितो यामुळे डिहायड्रेशनची समस्या होते. किडनी हा आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास किडनी खराब होऊ शकते. मात्र किडनीशी संबंधित समस्या इतक्या लवकर सापडत नाहीत. त्याची लक्षणे समजून घेणे गरजेचे आहे.

किडनी ही आपल्या शरीराचा अतिशय छोटापण सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग आहे. आरोग्यामध्ये अधिक महत्त्वाची भूमिका बजावते. किडनीचे (Kidney) आरोग्य सुरक्षित असेल तर आपले संपूर्ण आरोग्य निरोगी असेल.

मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी दररोज ३ ते ३.५ लिटर पाणी (Water) प्यायला हवे. यामध्ये फक्त पाणी पिणे आवश्यक नाही तर इतर द्रवपदार्थ जसे नारळ पाणी, ज्यूस, दूध (Milk), लिंबू पाणी किंवा ग्रीन टी पिऊ शकतो. जर तुम्ही डायलिसिसवर असाल तर तुमच्या शरीरासाठी किती पाणी योग्य असेल ते तुमच्या डॉक्टारांचा सल्ला घ्या.

  • हिवाळ्यात कमी प्रमाणात पाणी प्यायले जाते. परंतु, या काळात निदान ७ ते ८ ग्लास पाणी प्यायला हवे.

  • किडनी निरोगी असेल तर दररोज दीड ते दोन लिटर पाणी शरीरातून बाहेर पडणे गरजेचे आहे.

  • किडनी खराब असेल तर डोळ्यांभोवती आणि पायाभोवती सूज येते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर किडनीची नियमितपणे काळजी घ्या.

1. किडनी खराब असल्यावर लक्षणे कोणती दिसतात?

  • भूक न लागणे

  • जलद वजन कमी होणे

  • डोळे, हात आणि पायाखाली सूज येणे

  • रक्ताची कमतरता

  • मूत्रमध्ये रक्त

  • कोरडी त्वचा आणि खाज सुटणे

  • वारंवार मूत्रविसर्जन

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Ajinkya Rahane: रेडी टू स्ट्राइक...! अजिंक्य रहाणेने टीम इंडियाला खिजवलं; खेळाडू फ्लॉप ठरताच केली 'अशी' पोस्ट

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

SCROLL FOR NEXT