Kidney Damage google
लाईफस्टाईल

Kidney Damage: व्हिटॅमिन B12 च्या गोळ्या किडनीचं करतात नुकसान; तज्ज्ञांनी सांगितलेली कारणे एकदा वाचाच

Vitamin B12 Side Effects: व्हिटॅमिन B12 चा अतिरेक किडनीसाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः मधुमेह व किडनी आजार असलेल्या रुग्णांनी सप्लिमेंट्स घेताना खबरदारी घ्यावी.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या खाण्यापिण्याची सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात जंक फूड, स्ट्रीट फूड्स किंवा रेस्टॉरंटमधल्या महागड्या पदार्थांचा समावेश होताना आपल्याला पाहायला मिळतं. यामुळे शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्वे किंवा जीवनसत्वे मिळत नाहीत. यामध्ये व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेच्या कमीच्या समस्या तरुणांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच जाणवतात. यासाठी लोक मल्टिव्हिटॅमिन्सच्या गोळ्या, टॉनिक, इंजेक्शन किंवा क्लिनिकमध्ये जाऊन व्हिटॅमिन B12 चे शॉट्स घेणं पसंत करतात.

अनेकांना वाटतं या गोळ्यांचं वारंवार, जेव्हा वाटेल तेव्हा सेवन केलं तर आपल्याला भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि पोषक तत्वे मिळतील. मात्र यामुळे तुमच्या किडनीला होणारी हानी, धोका नकळत दुर्लक्षित होत असतो. कारण लोक रोज न चुकता सप्लिमेंट्स घेतात. याने शरीरातली घाण गाळण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या किडनी या अतिशय नाजूक अवयवांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

कॅनडामधील एका अभ्यासात, जो JAMA या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता, डायबिटीजमुळे किडनीचे आजार असलेल्या रुग्णांना जास्त प्रमाणात व्हिटॅमिन B12 आणि B6 देण्यात आलं. आश्चर्याची बाब म्हणजे, या रुग्णांची किडनी कार्यक्षमता प्लेसिबो घेणाऱ्यांपेक्षा वेगाने खालावली. याचा अर्थ असा नाही की B12 सर्वांसाठीच हानिकारक आहे, पण आधीच किडनीचे आजार असलेल्या लोकांसाठी हा एक इशारा नक्कीच आहे.

व्हिटॅमिन B12 हे पाण्यात विरघळणारे असल्यामुळे शरीराला नको असलेले अतिरिक्त प्रमाण लघवी बाहेर टाकले जाते, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र किडनीची कार्यक्षमता कमी झालेली असेल, तर ही फ्लश आउट प्रक्रिया नीट होत नाही. त्यामुळे B12 रक्तात साचून राहू शकते.

विशेष म्हणजे बाजारात मिळणाऱ्या B12 गोळ्या अनेकदा 500 मायक्रोग्रॅम किंवा 1000 मायक्रोग्रॅम इतक्या प्रचंड डोसमध्ये असतात, तर शरीराला दररोज फक्त सुमारे 2.4 मायक्रोग्रॅमचीच गरज असते. ही बाब लक्षात घेतली तर धोका स्पष्ट होतो.

अलीकडच्या काळात व्हिटॅमिन B12 इंजेक्शनचा ट्रेंडही वाढताना दिसतो. एकाच इंजेक्शनमधून 500 ते 1000 मायक्रोग्रॅम किंवा त्याहून जास्त B12 थेट रक्तप्रवाहात जातं. वय, डायबिटीज किंवा हाय ब्लडप्रेशरमुळे आधीच किडनीवर ताण असेल, तर हा थेट डोस शरीरासाठी जड ठरू शकतो. त्यामुळे B12 इंजेक्शन हे फक्त खऱ्या कमतरतेच्या स्थितीतच, जसे की पर्निशियस अ‍ॅनिमिया किंवा पोषण शोषणाच्या समस्या, यांसाठीच वापरले पाहिजे.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT