Kia Seltos Facelift Saam Tv
लाईफस्टाईल

Kia Seltos Facelift Variants: नवीन अपडेटसह किया भारतात लॉन्च! 7 नव्या व्हेरियंटसह देणार अनेक कंपन्याना टक्कर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kia Seltos Facelift Colours : Kia ने 2023 Seltos facelift SUV ची किंमत जाहीर केली. Kia Seltos फेसलिफ्टची भारतात किंमत 10.89 लाख रुपयांपासून 20 लाख रुपयांपर्यंत असेल. कंपनीने आठवडाभरापूर्वीच या कारसाठी बुकिंग सुरू केले आहे. हे 25,000 रुपयांच्या टोकन मनीसह बुक करता येईल. नवीन सेल्टोसला टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यातील नवीन व्हेरियंट,फिचर्सबद्दल माहिती जाणून घ्या

1. 2023 Kia Seltos facelift ची भारतातील किमत

2023 Kia Seltos facelift या कारची किमत १०.८९ लाख रुपये आहे.या कारमध्ये नवीन ७ व्हेरियंट येण्याची शक्यता आहे. या नवीन व्हेरियंटची किमत २० लाख रुपयांपर्यंत असेल. 2023 Kia Seltos ही कार ७ व्हेरियंटमध्ये विभागली गेली आहे.

ज्यात HTE, HTK, HTK+, HTX, HTX+, GTX+ आणि X-Line यांचा समावेश आहे. सर्वात आधी कियाने एसयूवीला २०१९मध्ये लॉन्च केले होते. आतापर्यंत या कारचे ७.५ लाख यूनिट भारतात विकले गेले आहे.परदेशात या कारचे २.५ लाख यूनिट विकले गेले आहे. नवीन सेल्टॉस कार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन बुक करता येईल.

2. 2023 Kia Seltos facelift मधील नवीन बदल

2023 Kia Seltos मध्ये डिझाइनसह काही नवीन बदल करण्यात आले आहे.डिझाइनबद्दल बोलायचे तर हँडलॅम्पमध्ये नवीन बदल करण्यात आले आहे. कलस्टरमध्ये नवीन एलईडी आणि डीएसएलआर लावण्यात आले आहे.फ्रंट ग्रिलमध्ये नवीन बदल करण्यात आले आहे.साइड प्रोफाइलमध्ये कोणतीही बदल करण्यात आला नाही.परंतु नवीन एलॉय व्हील डिझाइन आता या कारमध्ये दिली आहे. या कारमध्ये GT Line मध्ये १८ इंचचे व्हील्स वापरण्यात आले आहे. इतर व्हेरियंटमध्ये १६ आणि १७ इंचचे टायर लावण्यात आले आहे.

मागील डिझाइनमधील बदलाबद्दल बोलायचे तर, सेलटोसमध्ये नवीन उलटे एल-आकाराचे टेल लाइट्स देण्यात आले आहेत. हे टेलगेटसह एलईडी लाइट बारद्वारे जोडलेले आहेत. मागील बंपर देखील पुन्हा डिझाइन केले गेले आहे, आता त्यास उलटे लाईट्स मिळतात. नवीन आणि आकर्षक Pewter Olive पेंट स्कीम कंपनीने कारच्या नवीन व्हेरियंटमध्ये वापरली आहे.

कारच्या आत नवीन डॅशबोर्ड लावल्याचे दिसत आहे, ज्यामध्ये दोन 10.25-इंच स्क्रीन आहेत. यातील एक ड्रायव्हरचा डिस्प्ले आहे तर दुसरा मनोरंजनासाठी आहे. GT Line केबिन काळ्या रंगात देण्यात आली आहे. Tech Line ड्युअल टोन केबिन उपलब्ध आहे. नवीन सेल्टोसला पॅनोरॅमिक सनरूफ आहे. यात 360 डिग्री कॅमेरा देखील आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, क्लायमेट कंट्रोल आणि बोसची 8-स्पीकर ऑडिओ सिस्टम देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT