
Kia या कंपनीच्या कारची सर्वत्र खूप जास्त क्रेझ आहे. सध्या कारच्या सर्वोत्तम ब्रॅन्डमध्ये Kia चं नाव आघाडीचे आहे. जर तुम्हालाही Kia Seltos Facelift ही कार विकत घ्यायची असेल तर ही माहिती जरुर जाणून घ्या.
Kia Motorsने भारतात आपल्या कारला अपडेट करत सेल्टोसचे नवीन मॉडेल सेल्टॉस फेसलिफ्ट (2023 Kia Seltos Facelift) या कारला लॉन्च केले. कंपनीने या कारच्या डिझाइनपासून ते फिचर्स, स्पेसिफिकेशन आणि सुरक्षिततेमध्ये मोठ्या प्रमाणात अपडेट करण्यात आले आहे. सेल्टॉय फेसलिफ्ट ही कार ह्युंडाई क्रेटा,मारुती सुझुकी ग्रॅंड विटारा आणि मारुती कुशाक या कारशी स्पर्धा करते.
जर तुम्हाला कमी बजेटमधील चांगली कार विकत घ्यायची असेल तर 2023 Kia Seltos Facelift ही कार चांगला पर्याय आहे. या कारची किमत, इंजिन, फिचर, स्पेसिफिकेशनसह फायनान्सची माहिती पुढीलप्रमाणे
किया सेल्टॉस फेसलिफ्टच्या बेस मॉडेलच्या किंमतीबद्दल बोलायचे तर, या कारची सुरवातीची किमत ही १०,८९,९०० रुपये इतकी होती.ही कार बाजारात आल्यानंतर या कारची किमत १२,६२,६५५ झाली आहे.
जर तूम्ही Kia Seltos Facelift घ्यायचा विचार करत आहात तर फायनान्स प्लाननुसार ही कार तुम्ही १ लाख रुपयांचे डाउन पेमेंट करुन खरेदी करु शकतात.ऑनलाईन पेमेंट आणि ईएमआयनुसार ही कार खरेदी करण्यासाठी जर तुमच्याकडे १ लाख रुपयांचे बजेट असेल तर बॅंकेकडून तुम्हाला ११,६२,६५५ रुपयांचे लोन मिळू शकते. या लोनवर ९.८% प्रतिवर्ष व्याज लागेल.
Kia Seltos Facelift वर लोन मान्य झाले की, लगेच १ लाख रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल त्यानंतर पाच वर्ष (बॅंकेने दिलेल्या अवधीनुसार)प्रती महिना २४,५८९ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
किया सेल्टॉस बेस मॉडेलमध्ये कंपनीने 1497cc इंजिन दिले आहे. हे इंजिन 113.42 बीएचपी पावर आणि14Nm चा पीक टॉर्क निर्माण करतो.या इंजिनसोबत मॅन्युल ट्रान्समिशन दिले गेले आहे.
या कारच्या मायलेजबद्दल बोलायचे तर, किया सेल्टॉस मॅन्युल वेरियंटवर 16.50 प्रति लिटर का मायलेज देते. या मायलेजला ARAI द्वारा प्रमाणित केले गेले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.