Baby Care  Saam Tv
लाईफस्टाईल

Baby Care : लहान मुलांना आंघोळ घालताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा ! अन्यथा, बाळ पडेल आजारी

नवजात बाळाला आंघोळ घालण्यासाठी आईला खूप खबरदारी घ्यावी लागते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Baby Care : नवजात बाळाला आंघोळ घालण्यासाठी आईला खूप खबरदारी घ्यावी लागते. लहान बाळ खूप नाजूक असते अशा परिस्थितीत जर तुम्ही पहिल्यांदाच त्याला आंघोळ घालत असाल तुमची ही बाळाला आंघोळ घालण्याची पहिली वेळ असेल तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात.

नवजात बाळाला (Baby) पहिल्यांदा आंघोळ घालताना खूप खबरदारी घ्यावी लागते आईला अंघोळ घालताना बाळाची काळजी कशी घ्यायची हे समजायला जरा अवघड जाते. तुम्हालाही अशा समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही या टिप्सचा (Tips) उपयोग करू शकता.

नवजात बाळाला आंघोळ घालायला केव्हापासून सुरू केले पाहिजे?

नवजात बाळाला जन्मल्यानंतर 24 तासाच्या आत आंघोळ घातले पाहिजे असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे (WHO) म्हणणे आहे. जर तुम्ही काही कारणामुळे बाळाला आंघोळ घालण्यासाठी 24 तास थांबू शकत नसाल तर नवजात बाळाला आंघोळ घालण्यापूर्वी कमीत कमी सहा तास तरी थांबावे. काही संस्थांच्या असे म्हणणे आहे. की बाळाला जन्मल्यानंतर एक किंवा दोन तासात बाळाची आंघोळ झाली पाहिजे.

बाळाच्या आंघोळीपूर्वी मसाज करा -

बाळाचे मसाज करताना नेहमी सूर्यप्रकाशात बसावे अंगावर एक कपडा ठेवावा म्हणजे त्याला थंडी लागणार नाही. बाळाला मसाज साठी लागणारे तेल नेहमी कोमट असावे आणि पाणी सुद्धा कोमट असले पाहिजे. मालिश साठी तुम्ही खोबरेल तेल, मोहरीचे तेल आणि ऑलिव्ह ऑइल चा उपयोग करू शकता. मसाज करताना बाळासोबत खेळ पाहिजे,बोलले पाहिजे आणि वेगवेगळे गाणे म्हणावे त्यामुळे बाळा आंघोळीचा आनंद घेईल आणि रडणार नाही.

जास्ती गरम पाण्याचा वापर करू नये -

थंडी आहे म्हणून बाळाला आंघोळीसाठी जास्त गरम पाण्याचा वापर करू नये.बाळाची त्वचा खूप नाजूक आणि मऊ असते त्यामुळे जास्ती गरम पाण्याचा त्यांच्या त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. कोमट पाण्यानेच बाळाला आंघोळ घालावे त्याआधी आपण एकदा पाणी तपासून घेणे आवश्यक आहे.

दररोज आंघोळ करणे टाळा -

हिवाळ्यात तापमान खाली जाऊन थंडी वाढते त्यामुळे हिवाळ्यात बाळाला रोज अंघोळ घालणे टाळा. लहान मुलांना आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा आंघोळ घातली पाहिजे त्यामुळे त्यांना सर्दी खोकला असा आजार होणार नाही. अश्या वेळी तुम्ही बाळाला उबदार स्पंज करू शकता.

टॉवेल सोबतच ठेवा -

बाळाला आंघोळ घालत असताना जास्त वेळ आंघोळ घालू नका आणि आंघोलीळा गेल्यावर टॉवेल सोबत ठेवलाच पाहिजे. बाळाची आंघोळ झाली की लगेच त्याला टॉवेलमध्ये गुंडाळून बाहेर आणून दरवाजा बंद करून आणि उबदार कपडे घातले पाहिजे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT