Karwa chauth 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Karwa chauth 2023 : लग्नानंतर पहिल्यांदाच करवा चौथचा व्रत करताय? जाणून घ्या महत्त्व

Karwa Chauth Vrat : करवा चौथ हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो.

Shraddha Thik

First Time Karwa Chauth Vrat :

करवा चौथ हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. यंदा हा सण 1 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. विवाहित महिलांसाठी या सणाला (Festival) विशेष महत्त्व आहे. विवाहित महिलांनी या दिवशी व्रत पाळल्यास त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते, असे मानले जाते.

करवा चौथला करक चतुर्थी असेही म्हणतात. तुम्हीही पहिल्यांदाच हे व्रत करणार असाल तर हा लेख नक्की वाचा.या व्रतामध्ये महिला (Women) रात्री चंद्र पाहून उपवास सोडतात. तुम्हीही करवा चौथ व्रत करणार असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. चला तर मग जाणून घेऊया करवा चौथच्या व्रतामध्ये काय करावे आणि काय करू नये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

करवा चौथ व्रताच्या वेळी या गोष्टी लक्षात ठेवा

  • करवा चौथ व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी सोळा अलंकार परिधान करायचे. करवा चौथच्या दिवशी विवाहित (Married) महिलांनी मंगळसूत्र, नाकात नथ, टिकली, बांगड्या, कानातले इत्यादी घालणे बंधनकारक मानले जाते. या सर्व गोष्टी स्त्रियांसाठी सौभाग्य, समृद्धी आणि सुखी वैवाहिक जीवनाचे प्रतीक मानले जाते. या व्यतिरिक्त हातांनाही मेहंदी लावतात.

  • करवा चौथच्या सणामध्ये सरगीला खूप महत्त्व आहे. सरगी थाळी विवाहित महिलांना त्यांच्या सासूबाई देतात.

  • जर तुम्ही करवा चौथ व्रत करणार असाल तर चुकूनही सरगी वगळू नका. सरगीच्या ताटात असलेले खाद्यपदार्थ जरूर खा. साधारणपणे सरगीच्या ताटात अशा काही गोष्टी असतात, जे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यामध्ये फळे, नारळ, सुका मेवा, मिठाई, ज्यूस इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश होतो.

  • उपवास सोडताना तळलेले पदार्थ खाणे टाळा, कारण त्यामुळे गॅस, पोट खराब होणे किंवा पोटात गोळा येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. उपवास सोडताना तुम्ही तुमच्या आहारात नारळ पाणी, सुका मेवा इत्यादी गोष्टींचा समावेश करू शकता.

  • करवा चौथच्या दिवशी लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते, तर विवाहित महिलांनाही या दिवशी पांढरा किंवा काळा रंग परिधान करण्यास मनाई आहे. या खास प्रसंगी तुम्ही लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी इत्यादी रंगांचे कपडे घालू शकता.

  • करवा चौथच्या सणात विवाहित महिलांनी उपवास सोडण्यापूर्वी संध्याकाळी कथा ऐकावी असे मानले जाते. या पद्धतीचा अवलंब केल्याशिवाय निर्जला व्रत अपूर्ण मानले जाते.

  • विवाहित महिला आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी करवा चौथच्या दिवशी मांसाहार टाळावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: Pune: वारजे पुलाखाली मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Sand Mafia : वाळू माफियांची मुजोरी; तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pitra Dosh 2025: पितृ दोष असल्यास जीवनात 'हे' संकेत मिळतात

PUNE: बड्या नेत्याच्या बर्थडे पार्टीत भयंकर घडलं, मिरवणुकीदरम्यान DJ वाहनानं ६ जणांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

Kidney failure warning signs: किडनी फेल झाल्यानंतर फक्त रात्रीच्या वेळी दिसतात 'हे' बदल; 90% लोकं करतात इग्नोर

SCROLL FOR NEXT