Karwa Chauth 2023 : सौभाग्याच्या रक्षणासाठी 'करवा चौथ'चे करतात व्रत, कशी कराल पुजा? जाणून घ्या

Karwa Chauth 2023 Pooja Vidhi: करवा चौथच्या दिवशी विवाहित स्त्रिया आणि विवाहित मुली त्यांच्या जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी निर्जला व्रत करतात.
Karwa Chauth 2023
Karwa Chauth 2023 Saam Tv
Published On

Karwa Chauth 2023 Vrat:

हिंदू कॅलेंडरनुसार, करवा चौथचा उपवास दरवर्षी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला केला जातो. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते, याला वक्रतुंड संकष्टी चतुर्थी म्हणतात.

करवा चौथच्या दिवशी विवाहित स्त्रिया (Women) त्यांच्या जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी निर्जला व्रत करतात. या व्रतामध्ये चंद्राची पूजा (Puja) करून अर्घ्य देणे आवश्यक आहे. जाणून घ्या करवा चौथ कधी आहे? मुहूर्त, चंद्र अर्घ्य वेळ आणि पारण कधी असेल?

करवा चौथ कधी आहे?

वैदिक कॅलेंडरनुसार, यावेळी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी मंगळवार, 31 ऑक्टोबर रोजी रात्री 09:30 वाजता सुरू होत आहे. ही तारीख बुधवार, 01 नोव्हेंबर रोजी रात्री 09:19 वाजता संपेल.

करवा चौथ व्रत बुधवार, 1 नोव्हेंबर रोजी उदयतिथी आणि चतुर्थीच्या चंद्रोदयाच्या आधारे पाळण्यात येईल. या दिवशी 13 तास 42 मिनिटे निर्जल उपवास करावा लागणार आहे. हे व्रत सकाळी 06.33 ते रात्री 08.15 पर्यंत असेल.

Karwa Chauth 2023
Kojagiri Purnima 2023 : कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी पडतेय चंद्रग्रहणाची सावली करा हे उपाय, लक्ष्मी देवी राहिल नेहमी प्रसन्न

मुहूर्त काय आहे?

बुधवार, 01 नोव्हेंबर रोजी करवा चौथ व्रत करणाऱ्या महिलांना संध्याकाळी पूजेसाठी 1 तास 18 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल. करवा चौथ पूजेचा (Puja) शुभ मुहूर्त संध्याकाळी 05:36 ते 06:54 पर्यंत आहे.

Karwa Chauth 2023
Kojagiri Purnima 2023 : कोजागरी पौर्णिमेला चंद्रग्रहणाचे सावट, कशी कराल पूजा? जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त

पूजा आणि अर्घ्याची वेळ काय आहे?

करवा चौथच्या दिवशी रात्री 08:15 वाजता चंद्रोदय होईल. या वेळेपासून तुम्ही चंद्रपूजेसोबत अर्घ्य देऊ शकता. चंद्राला अर्घ्य अर्पण केल्याने व्रत पूर्ण होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पारण वेळ

आदल्या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडणे म्हणजे पारण. करवा चौथ व्रताचे पारण चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर केले जाते. पतीच्या हातचे पाणी (Water) पिऊन व्रत पूर्ण होते. 1 नोव्हेंबर रोजी रात्री 08:15 नंतर तुम्ही कधीही पारण करू शकता.

Karwa Chauth 2023
Kojagiri Purnima 2023: कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? जाणून घ्या मुहूर्त

यंदा तीन योग आहेत

यावर्षी करवा चौथला तीन योग तयार होत आहेत. या दिवशी सकाळी 06:33 पासून सर्वार्थ सिद्धी योग सुरू होत आहे, जो दुसऱ्या दिवशी पहाटे 04:36 पर्यंत चालू राहील. सर्वार्थ सिद्धी हा शुभ योग मानला जातो. यामध्ये केलेले कार्य यशस्वी ठरते. त्या दिवशी सकाळपासून दुपारी 02:07 पर्यंत परीघ योग आहे, त्यानंतर शिवयोग सुरू होईल, जो दुसऱ्या दिवशीपर्यंत राहील. करवा चौथच्या दिवशी मृगाशिरा नक्षत्र दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबरला पहाटे 4.36 पर्यंत आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com