Bitter gourd for monsoon health freepik
लाईफस्टाईल

Bitter Gourd Benefits In Monsoon : पावसाळ्यात खा कारलं, मिळवा आरोग्यदायी फायदे

Health Benefits of Eating Bitter Gourd : पावसाळ्यात कारले खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच पचन सुधारते, रक्तदाब नियंत्रित राहते. आरोग्य टिकवण्यासाठी कारले हे नैसर्गिक सुपरफूड मानले जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बहुतेकजणांना कारल्याची भाजी आवडत नाही. पण कारल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, म्हणून तुम्ही तुमच्या आहारात नक्कीच कारल्याचा समावेश करायला हवा. मधुमेह असणाऱ्या लोकांना डॉक्टर कारल्याचा रस पिण्याचा सल्ला देतात. तसेच पावसाळ्यात कारलं खाल्ल्याने ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. पावसाळ्यात हवामान बदल, दुषित हवा, पाणी यामुळे अनेक आजार उद्भवतात. कारल्यामध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात जे या आजारांवर मात करण्यास उपयोगी ठरतात.

पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. पावसाचा आनंद घेण्यासाठी सर्वचजण बाहेरचं चमचमीत खात असतात. बाहेरच्या खाण्यामध्ये वापरलेले पाणी, तेल इतर पदार्थ दुषित असू शकतात. यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. कारल्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. शरीराला कोणत्याही इन्फेक्शनपासून दूर ठेतात. शिवाय त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात.

कारलं ही फायबरने परिपूर्ण असलेली भाजी आहे. कारल्यातील कडू रस शरीरात पचनासाठी आवश्यक असलेला पदार्थ तयार करतो यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच त्यात खुप कमी कॅलरीज असतात ज्यामुळे वजन कमी करण्यासही कारले फायदेशीर ठरते. कारलं खाल्ल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. ज्यांना बद्धकोष्ठता, कॉलेस्ट्रोल सारख्या समस्या आहेत त्यांच्यासाठी कारले खाणे अतिशय फायदेशीर ठरते.

कारले नैसर्गिकरीत्या शरीरातील नको असलेले विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम करते. यामुळे रक्तशुद्धीकरण होते. शिवाय कारल्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरते. तुमच्या आहारात नियमितपणे कारल्याचे सेवन केल्यास त्यामधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवर मुरूमं, पुरळ येण्यापासून रोखतात. यामुळे त्वचा तरूण व चमकदार दिसते. पावसाळ्यात आर्द्रतेमुळे केसात कोंडा आणि केसगळतीही होते. कारल्याचा रस केसांना लावल्याने कोंडा कमी होतो. केस चमकदार आणि रेशमी होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT