Durgadi Fort google
लाईफस्टाईल

Durgadi Fort : कल्याणमधील दुर्गाडी किल्ला पाहाल तर थक्क व्हाल; नवरात्रीत पर्यटकांची होते गर्दी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मौर्य काळापासून कल्याण शहराचा उल्लेख केला जातो. हे शहरात अनेक इतिहास घडले आहेत. दुर्गाडी किल्ला सातवाहनांच्या राजवटीमध्ये कल्याण बंदर खूप प्रसिद्ध होते. त्यातीलच प्रसिद्ध ठिकाण म्हणजे कल्याण मधला दुर्गाडी किल्ला. अनेक पर्यटक तिथे जावून इतिहासात घडलेल्या गोष्टींचे ज्ञान घेतात. तिथे उत्तम निसर्ग अनुभवता येतो. तुम्ही तिथे कमी वेळात सगळ्यात जास्त गोष्टींचा अनूभव घेवू शकता. तसेच तिथली मंदीरे पाहू शकता.

दुर्गाडी किल्लाचा इतिहास

दुर्गाडी किल्ला हा महाराष्ट्रात आहे. ठाणे जिल्ह्यामधल्या कल्याण पश्चिम परिसरात हा किल्ला स्थित आहे. कल्याणच्या खाडीलगत हा किल्ला बांधण्यात आला आहे. त्या किल्यावर एक हिंदू मंदीर आहे. ते पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जात असतात. त्या किल्यावर राज्यांच्या काळात अनेक किस्से घडलेले आहेत. हे बांधकाम शाहजानच्या कारकिर्दीपासुन सुरू झाले होते. ते १६९४ मध्ये औरंगजेबाच्या काळात त्याचे काम पुर्ण केले.

दुर्गाडी किल्ल्याची वैशिष्ट

कल्याण हे शहर फार जुन्या काळापासून नावाजलेले आहेत. तिथे दुर्गाडी किल्ला हा फार पुर्वीपासून तयार केलेला आहे. ह्या किल्याचे वैशिष्ट्ये म्हणजे हा एक भुईकोट किल्ला आहे. ज्या किल्लाला ११ बुरुज आणि असंख्य दरवाजे आहेत. मौर्य काळापासून कल्याण शहराचा उल्लेख केला जातो. तिथेच दुर्गाडी मातेचे मंदीर आहे. या गडावर एक मशीद आहे.

दुर्गाडी किल्ल्याला प्रवास कसा कराल?

तुम्ही तुमच्या जवळच्या रेल्वे स्थानकावरुन कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत या. तिथून रिक्षा किंवा टॅक्सीचा वापर करुन दुर्गाडी किल्याजवळ पोहोचू शकता. तुम्ही १०-१५ मिनिटात किल्ल्याजवळ पोहचू शकतो. तिथे जाताना तुम्ही खाद्यपदार्थ सोबत घेवून जावू शकता. गडावर खाद्य पदार्थांची सोय नाही. तसेच पाण्याची सोय नाही.

Edited By: Sakshi Jadhav

VIDEO : मविआतील तिढा सुटला, दसऱ्यापूर्वी जागावाटपाची घोषणा ?

Kangana Ranaut: कंगनाने खरेदी केली कोट्यावधी रुपयांची कार; जाणून घ्या फीचर्स

Marathi News Live Updates : माढ्यात आमदार बबन शिंदे यांच्या उमेदवारीला शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून विरोध

Hair Care Tips : सतत केस गळतायत? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश; आठवड्यात दिसतील परिणाम

Dasara melava 2024 News : यंदा शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार? महत्वाची माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT