Hill Station  Saam tv
लाईफस्टाईल

Hill Station : आजूबाजूला डोंगर, चोहीकडे शुद्ध हवा, निवांत ठिकाण; स्वर्गाहूनही सुंदर शहर, जाणून प्रेमात पडाल

kalpa Hill Station : हिमाचल प्रदेशातील कल्पा हिल स्टेशन सुंदर ठिकाण आहे. हिमाचल प्रदेशातील या हिल स्टेशनला धार्मिक महत्व देखील आहे.

Vishal Gangurde

कल्पा हिल स्टेशन किन्नौर जिल्ह्यातील शांत आणि सुंदर ठिकाण

स्टेशनवर प्राचीन मंदिर, मठ, सफरचंद बाग आणि निसर्गरम्य दृश्ये

चक्का ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध

कल्पा शिमलाहून २६० किमी आणि चंडीगडहून ३३० किमी अंतरावर

काश्मीरनंतर हिमाचल प्रदेशाला निर्सगाची फार मोठी देणगी लाभली आहे. काश्मीरनंतर पर्यटकांची वाट हिमाचल प्रदेशकडे वळते. चारी बाजूने डोंगर, हिरवेगार जंगल,वाहता झरा, शुद्ध हवा यामुळे हिमाचलला पर्यटकांची संख्या वर्षानुवर्षे वाढू लागली आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येत पर्यटक हिमाचल प्रदेशात येत असतात. शहरातील धावपळीला विराम देत लोक क्षणभर विश्रांतीसाठी हिमाचल प्रदेश गाठतात. याच हिमाचल प्रदेशमध्ये फिरण्यासारखी अनेक शहरे आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये फिरायचं असेल तर डलहौजी, धर्मशाला, शिमला, मनाली आणि कसोल या सारख्या शहरात पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. हिमाचल प्रदेश अनेक शांत ठिकाण देखील आहेत. या हिमाचल प्रदेशमध्ये सुंदर हिल स्टेशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

कल्पा हिल स्टेशन

हिमाचल प्रदेशमधील किन्नोर जिल्ह्यात सुंदर हिल स्टेशन आहे. सतलुज नदीजवळ कल्पा हिल स्टेशन वसलं आहे. शिमलापासून जवळपास २६० किलोमीटर दूर आणि सोलनपासून २२५ किलोमीटर दूर अंतरावर आहे. तुम्हाला वर्दळीच्या ठिकाणापासून दूर जायचं असेल, कल्पा हिल स्टेशन तुमच्यासाठी बेस्ट आहे. या हिल स्टेशनवर अनेक मंदिर आणि मठ आहेत. त्यामुळे या हिल स्टेशनला धार्मिक महत्व प्राप्त झालं आहे. कल्पा हे किन्नर कैलाशपासून १२ किलोमीटर अंतरावर आहे.

कल्पाजवळ कामरु किल्ला आहे. या किल्ल्यावरून आजूबाजूचा सुंदर परिसर दिसतो. सपनी किल्ला, सांगला पात्र देखील जवळच आहे. या भागात भिंतीवर सुंदर चित्र काढण्यात आले आहेत. हिल स्टेशनवरून सुंदर निसर्ग पाहायला मिळतो. कल्पामध्ये सफरचंदाचे बाग आहेत. कल्पाजवळ चाका नावाची सुंदर जागा आहे. या ठिकाणाला चक्का नावानेही ओळखलं जातं. चक्का हे ट्रेकिंसाठी ओळखलं जातं.

कल्पा हिल स्टेशनला कसं पोहोचणार?

तुम्ही शिमला विमानतळावर पोहोचला. त्यानंतर शिमलाहून खासगी वाहन तयार करून कल्पा येथे पोहोचू शकतात. चंडीगडपासून कल्प ३३० किलोमीटर दूर आहे. चंडीगडहून रिकांग पियो जाऊ शकता. तिथून कल्पा ७ किलोमीटर दूर आहे. रिकांग पियो येथून खासगी वाहनाने कल्पाला पोहचू शकता. तुम्ही सोलनपासून टॅक्सीने जाऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: नुकतेच १८ वर्षे पूर्ण केलेल्या...,राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला सणसणीत प्रश्न|VIDEO

Washim : अट्टल मोटरसायकल चोरटा ताब्यात; ९ मोटरसायकल जप्त, रिसोड पोलिसांची कारवाई

Maharashtra Live News Update: महाविकास आघाडीची पत्रकार परिषद उद्या होणार - जयंत पाटील

Maharashtra Cabinet: ५० हजार कोटींची गुंतवणूक, ५ लाख रोजगार निर्मिती; फडणवीस सरकारचे ३ मोठे निर्णय

Bhopuri Actress Photos: कोण आहे ही सुंदरा? जिच्या सौंदर्याचा इंटरनेटवर जलवा

SCROLL FOR NEXT