Diabetes, Health tips
Diabetes, Health tips  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

मधुमेह असणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल कलोंजी जाणून घ्या, त्याचा उपयोग

कोमल दामुद्रे

मुंबई : बदलेली जीवनशैली व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे दिवसेंदिवस मधुमेह हा सामान्य आजार बनत चालला आहे. याची लक्षणे आता वयोवृध्दांपासून तरुणांमध्ये देखील आढळून येत आहे.

हे देखील पहा -

बदलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव व अयोग्य आहारांमुळे आपल्या मधुमेहाचा त्रास जडू शकतो. रक्तातील साखरेची पातळी वाढली की, आपल्या अनेक त्रास उद्भवू शकतात. मधुमेह हा असा आजार आहे तो एकदा का जडला की, तो पुन्हा जाण्याचे नाव घेत नाही. आहारात बदल केला की, त्याला नियंत्रणात ठेवता येते. त्याच वेळी, काही लोक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी औषधांचा अवलंब करत असतात परंतु, औषधाव्यतिरिक्त देखील आपण रक्तात वाढलेली साखरेची (Sugar) पातळी कमी करु शकतो. आपल्या स्वयंपाकघरात (kitchen) असे अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे आपले अनेक आजार सहज बरे होतात. जेवणाची चव वाढवण्यासोबतच मधुमेहाच्या रुग्णांसाठीही कलोंजी अतिशय गुणकारी मानली जाते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात ज्याचा उपयोग टाइप २ च्या मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरु शकतो. कलोंजीचा वापर करुन आपण मधुमेह नियंत्रणात ठेवू शकतो. याचा उपयोग कसा करायचा हे जाणून घेऊया.

१. कलोंजीच्या बिया चांगल्या प्रकारे कुस्करून घ्या. त्यानंतर या बिया ग्लासात पाण्यात घेऊन हळूहळू प्या. रोज असे केल्याने खूप फायदा होईल.

२. ग्लासभर पाण्यात चमचाभर बडीशेप व कलोंजी उकळवा. नंतर हे पाणी प्या. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते.

३. तसेच चहा पिण्याची सवय असेल तर कलोंजी व बडीशेपचे पाणी उकळवून सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळा घ्या असे केल्याने फायदा होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत कसा पराभव झाला ते संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहिती, चंद्रहार पाटील यांचा रोख कोणाकडे?

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

SCROLL FOR NEXT