Job Interview Tips Saam TV
लाईफस्टाईल

Job Interview Tips: इंटरव्ह्यूला जाण्याआधी अशी तयारी करा; त्याच दिवशी हातात ऑफर लेटर मिळेल

Job Interview Tips in Marathi: प्रश्नांची उत्तरे, विविध विषयांबाबद आपले विचार या सर्वच गोष्टी तापसल्या जातात. अनेकदा इंटरव्ह्यूमध्ये प्रश्नांची उत्तरे चांगली दिली आपल्याला त्या विषयी सर्व काही येत असेल मात्र तरिही आपलं सिलेक्शन काही होत नाही.

Ruchika Jadhav

नोकरीसाठी प्रत्येक ठिकाणी आधी आपला इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखत घेतली जाते. यामध्ये आपण त्या कंपनीसाठी किंवा ठरावीक पोस्टसाठी योग्य आहोत की नाही या गोष्टी तपासल्या जातात. विविध प्रश्नांची उत्तरे, विविध विषयांबाबद आपले विचार या सर्वच गोष्टी तापसल्या जातात. अनेकदा इंटरव्ह्यूमध्ये प्रश्नांची उत्तरे चांगली दिली आपल्याला त्या विषयी सर्व काही येत असेल मात्र तरिही आपलं सिलेक्शन काही होत नाही.

इंटरव्ह्यूला गेल्यावर फक्त ठरावीक विषयाचे ज्ञान तपासले जात नाही. यामध्ये तुमची बोलण्याची पद्धत आणि अन्य सर्व गोष्टींकडे देखील लक्ष दिले जाते. इंटरव्ह्यू उत्तम गेल्यावर आपल्याला हवी तेवढी सॅलरी देण्यास देखील समोरील व्यक्ती तयार होतो. मात्र इंटरव्ह्यू व्यवस्थिन न झाल्यास त्याचा परिणाम आपल्या पगारावर सुद्धा होतो. त्यामुळे इंटरव्ह्यूला जाण्याआधी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल जाणून घेऊ.

कंपनी बद्दल रिसर्च करा

तुम्ही ज्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी जाणार आहात त्या कंपनी बद्दल थोडं रिसर्च करा. कंपनीचं क्लचर कसं आहे. तेथील इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे. या बाबत आधी थोडी माहिती घ्या. त्याने तुम्हाला मुलाखत देताना थोडी मदत होईल.

घाईघाईत उत्तरं देऊ नका

इंटरव्ह्यूला गेल्यावर मन आणि डोकं अगदी शांत ठेवा. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जास्त घाईघाईमध्ये देऊ नका. तुम्ही घाईघाईत एखादं उत्तर दिलं तर तुम्हाला जे म्हणायचंय ते स्पष्ट सांगता येणार नाही. अनेकदा आपल्याला समोरच्या व्यक्तीने विचारलेला प्रश्न निट समजत नाही. त्यामुळे उत्तर देण्याआधी आपला गोंधळ होतो. तेव्हा प्रश्न विचारा. पुन्हा प्रश्न विचारल्यावर तुमची इमेज डाउन होईल, किंवा ते काय विचार करतील असा विचार तुम्ही करू नका.

स्वत:चं मत सांगा

अनेकदा पगाराच्या मुद्द्यावरून कंपनी तुम्हाला हवा तेवढा पगार देत नाही. त्यावेळी पगाराबद्दल बोलताना त्यासाठी तुम्ही किती पात्र आहात ते समोरच्याला पटवून द्या. यावेळी तुम्ही स्वत:चं मत तेथे मांडणं महत्वाचं आहे.

जास्त बोलू नका

मुलाखत जरी तुमची असली तरी तुम्हाला विचारले जाईल तितक्याच प्रश्नांची उत्तरे द्या. तुम्हाला संधी दिली जाईल तेव्हाचं स्वत:चं मत किंवा विचार मांडा. समोरील व्यक्ती काही सांगत असताना त्याचं बोलणं मध्येच थांबवावे लागेल असं काही बोलू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT