Jio Recharge offer, Jio 1198 New Recharge Offers Details In Marathi  Saam Tv
लाईफस्टाईल

Jio चा जबरदस्त रिचार्ज! 14 OTT, Data आणि अनलिमिटेड कॉल्स सर्व काही एकाच प्लानमध्ये, ऑफर्स पाहा

कोमल दामुद्रे

Jio 1198 Recharge Plan Details :

जिओने पुन्हा एकदा जबरदस्त रिचार्ज प्लान आणला आहे. यामध्ये कंपनी ग्राहकांना एकाच प्लानमध्ये डेटा, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अनलिमिटेड कॉल्स ऑफर करत आहे. यामुळे ग्राहकांना अधिकचा फायदा होईल.

जिओच्या (Jio) या रिचार्ज प्लानमध्ये ओटीटी सबस्क्रिप्शन, डेटा व्हाउचर, मनोरंजन, वार्षिक योजना आणि डेटा बूस्टर सारख्या अनेक गोष्टी आहेत. जिओने असाच एक रिचार्ज प्लान आणला आहे त्यामध्ये फ्री कॉलिंग, डेटा, फ्री ओटीटी (OTT) सबस्क्रिप्शन यांसारख्या अनेक सुविधा मिळतील.

1. जिओचा ११९८ रुपयांचा रिचार्ज प्लान

जिओचा हा रिजार्च प्लान ११९८ रुपयांचा आहे. कंपनी या प्लानमध्ये ग्राहकांना अनेक ऑफर देत आहे. या प्लानमध्ये कंपनी आपल्या वापरकर्त्यांना ८४ दिवसांची वैधता ऑफर करत आहे. तुम्ही ८४ दिवस कोणत्याही नेटवर्कवर फ्रीमध्ये कॉल करु शकता.

या प्लानमध्ये तुम्हाला जिओ ८४ दिवसांसाठी १६८ जीबी डेटा ऑफर (Offer) करते आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दिवसाला दररोज २ जीबी डेटा वापरता येणार आहे. या रिचार्ज प्लानमध्ये डेटासोबतच फ्रीमध्ये दिवसाला १०० एसएमएस देखील मिळणार आहे.

2. जिओच्या या प्लानमध्ये १४ पेक्षा जास्त ओटीटी सबस्क्रिप्शन

रिलायन्स जिओच्या या ११९८ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना १४ ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये मिळते आहे. या प्लानमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन ९० दिवस, प्राइम व्हिडिओ ८४ दिवसांसाठी उपलब्ध आहे. तसेच यामध्ये जिओ सिनेमाची सुविधा देखील ८४ दिवसांसाठी देण्यात येत आहे.

याशिवाय जिओ ग्राहकांना Sony LIV, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, Docubay, EPIC ON आणि Hoichoi चे मोफत सबस्क्रिप्शन JioTV अॅपद्वारे देते आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT