Jio New Recharge Saam Tv
लाईफस्टाईल

Jio धन धना धन ! 5G Data आणि Unlimited Calling सह वर्षभर फुकटात पाहाता येईल Disney + Hotstar; युजर्सची होणार मज्जा

Jio New Recharge : जिओने आपल्या ग्राहकांसाठी तीन नवे रिचार्ज प्लान ऑफर केले आहेत. ज्यामध्ये अनलिमिटेड कॉल्स, डेटा आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन वर्षभरासाठी फ्रीमध्ये पाहाता येणार आहे.

कोमल दामुद्रे

Jio Recharge Plan :

रियालन्स जिओ ही देशातील सगळ्यात मोठी टेलीकॉम कंपनी आहे. प्रत्येक महिन्यात जिओ टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज ऑफर करत असते. यामध्ये ग्राहकांसाठी प्रीपेड, पोस्टपेड आणि ब्रॉडबँड प्लान्स आहेत.

जिओने आपल्या ग्राहकांसाठी तीन नवे रिचार्ज प्लान ऑफर केले आहेत. ज्यामध्ये अनलिमिटेड कॉल्स (Calls), डेटा आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन वर्षभरासाठी फ्रीमध्ये पाहाता येणार आहे. या प्लानची किमत (Price) देखील स्वस्त असणार आहे. जाणून घेऊया रिचार्जची लिस्ट

1. 4498 रुपयांचा जिओ प्रीपेड प्लान

जिओने (Jio) हा प्लान काही दिवसांपूर्वीच लॉन्च केला आहे. ४४९८ रुपयांच्या या प्लानमध्ये १४ OTT सबस्क्रिप्शन मिळणार आहे. हा प्लान ३६५ दिवसांसाठी असणार आहे. तसेच यामध्ये २ जीबी डेटा आणि दिवसाला १०० एसएमएस मिळणार आहे. Amazon Prime Video, JioCinema Premium, Disney + Hotstar Mobile सोबत Sony Liv, Zee5, Lionsgate Play, Discovery Plus, Sun NXT, Kancha Lanka, Planet Marathi, Chaupal., DocuBay, EPIC आणि Hoichoi चे फ्री सबस्क्रिप्शन वर्षभरासाठी मिळणार आहे.

2. 3178 रुपयांचा जिओ प्रीपेड प्लान

जिओचा हा प्लान ३६५ दिवसांसाठी असणार आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग्सह दिवसाला २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. तसेच या प्लानमध्ये वर्षभरासाठी Disney + Hotstar, Jio Tv, Jio Cinema आणि Jio Cloud फ्रीमध्ये मिळणार आहे. या प्लानमध्ये 5G डेटा देखील मिळणार आहे.

3. 598 रुपयांचा जिओ प्रीपेड प्लान

जिओचा हा प्लान २८ दिवसांसाठी येतो. परंतु, यामध्ये तुम्हाला Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन हे वर्षभरासाठी फ्रीमध्ये मिळणार आहे. या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग्सह दिवसाला २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळणार आहे. यासोबतच ग्राहकांना Jio Tv, Jio Cinema आणि Jio Cloud देखील फ्रीमध्ये पाहाता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Internship Scheme: खुशखबर! तरुणांना चांगल्या कंपनीत इंटर्नशिपची संधी; स्टायपेंडदेखील मिळणार; पीएम इंटर्नशिप योजना आहे तरी काय?

Marathi Actress Saree Photos: हिरवी साडी आणि हिरव्या बांगड्या, अभिनेत्रीचं मराठमोळं सौंदर्य पाहून चंद्रही लाजला...

Maharashtra News Live Update: ऐन लग्नसराईच्या काळात अमरावतीत फुलांचे दर घसरल

Gold Rate Today: युद्ध थांबताच सोन्यानं उच्चांक गाठला, सोनं ३९,८०० रुपयांनी महागलं; २४ अन् २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

SCROLL FOR NEXT