Jio Yearly Recharge Plan  Saam Tv
लाईफस्टाईल

Jio चा जबरदस्त प्लान! अनलिमिटेड कॉल्स, ७३० जीबी डेटा अन् फ्रीमध्ये पाहाता येणार Amazon Prime चे सबस्क्रिप्शन

कोमल दामुद्रे

Jio Recharge Plan :

रिलायन्स जिओने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लानची ऑफर आणली आहे. रिलायन्स जिओ ही देशीतील सगळ्यात मोठी कंपनी असून ती प्रत्येक महिन्यात ग्राहकांना नवीन रिचार्ज ऑफर करत असते.

अशातच जिओने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज आणला आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड कॉल्स, डेटा आणि फ्रीमध्ये Amazon Prime चे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. रिचार्ज प्लान कितीचा पाहूया.

कंपनीने ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या योजना उपलब्ध करुन दिल्या आहेत. ज्यामध्ये ओटीटी सबस्क्रिप्शनही मिळत आहे. जर तुम्ही देखील Amazon Prime चे युजर असाल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो.

रियालन्स जिओचा हा प्लान ३२२७ रुपयांना (Price) मिळत आहे. यामध्ये युजर्सना अनेक फायदे मिळतील. हा प्लान तुम्हाला ३६५ दिवसांची वैधता देईल. या प्लानमध्ये कोणाशीही वर्षभर फ्रीमध्ये बोलू शकता.

यामध्ये जिओ आपल्या ग्राहकांना वर्षाला ७३० जीबी डेटा ऑफर (Offer) करत आहे. अर्थात तुम्हाला दिवसाला २ जीबी डेटा वापरता येईल. तसेच यामध्ये तुम्हाला दिवसाला १०० एसएमएस देखील मिळणार आहे.

1. फ्रीमध्ये मिळणार Amazon Prime चे सबस्क्रिप्शन

३२२७ रुपयांच्या या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला Amazon Prime चे सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये मिळणार आहे. यामध्ये तुमचे वर्षभर मनोरंजन होईल. त्यात तुम्हाला प्राइम व्हिडिओचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

तसेच प्राइम व्हिडिओ व्यतिरिक्त तुम्हाला अनेक फायदे मिळतील. या प्लानमध्ये कंपनी यूजर्सना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन देणार आहे. यात अनेक मोफत कॉलिंग तसेच मोफत OTT स्ट्रीमिंगचा लाभ घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

Lebanon pager explosion : लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा भीषण हल्ला, पेजर स्फोटांमागे कुणाचा हात? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT