Jio V/S Airtel
Jio V/S Airtel Saam Tv
लाईफस्टाईल

Jio V/S Airtel : Jioचा 'हा' प्लान Airtel पेक्षा 360 रुपयांनी स्वस्त, अनलिमेटड Calling सह 2.5GB डेटा दिवसाला फ्री

कोमल दामुद्रे

Jio V/S Airtel : Jio 2999 Plan vs Airtel 3359 Plan : तुम्ही टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ किंवा एअरटेल वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज आम्ही Reliance Jio आणि Airtel सोबत उपलब्ध असलेल्या एका प्लानबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये दीर्घ वैधतेसह 2.5 GB प्रति दिन डेटा मिळतो.

आम्ही Jio 2999 प्लॅन आणि Airtel 3359 प्लानबद्दल बोलत आहोत, हे दोन्ही प्लान एकमेकांशी कसे टक्कर देतात हे जाणून घेऊया.

1. Airtel 3359 प्लान तपशील :

या Airtel प्रीपेड प्लानमध्ये दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS दररोज दिले जातात. या प्लानमध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे.

2. एअरटेल प्लानचे इतर फायदे (Benefits) :

डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाइल 1 वर्षासाठी, 1 वर्षासाठी Amazon प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचा मोफत प्रवेश या प्लानमध्ये उपलब्ध असेल. याशिवाय 3 महिने अपोलो 24/7 सर्कल मेंबरशिप, फ्री हेलोट्यून, विंक म्युझिक आणि फास्टॅगवर 100 रुपयांच्या (Price) कॅशबॅकचा लाभ मिळेल.

3. Jio 2999 प्लान तपशील :

या Jio प्लॅनमध्ये, दररोज 2.5GB सह, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS सुविधा दिली जात आहे. या प्लानमध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध असेल, या रिचार्ज प्लानची ​​खास गोष्ट म्हणजे यूजर्सना 23 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळेल. हा प्लान एकूण 912.5GB डेटा देईल.

4. रिलायन्स जिओ प्लानचे इतर फायदे :

या प्लानमध्ये, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ (Jio) क्लाउड आणि जिओ सिक्युरिटी यांसारख्या अॅप्सचा मोफत प्रवेश 23 दिवसांच्या अतिरिक्त वैधतेसह दिला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Voting LIVE : चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४२.३५ टक्के मतदान

Vishwambhar Choudhari : विश्वंभर चौधरी यांना धक्का; मतदार यादीतून नाव गायब, मतदानाच्या हक्कापासून राहिले वंचित

Stale Chapattis : रात्रीच्या उरलेल्या शिळ्या चपात्यांची स्पेशल रेसिपी

Bullet Fire Video: धावत्या बुलेटने घेतला पेट, आग विझवताना भीषण स्फोट; १० जण होरपळले|काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

Baramati Lok Sabha: EVM गोडाऊनमधील CCTV बंद का? Saam TV च्या बातमीनंतर आयोगाचं स्पष्टीकरणही समोर

SCROLL FOR NEXT