Janmashtami 2024 Wishes Saam TV
लाईफस्टाईल

Janmashtami 2024 Wishes : श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त सुंदर व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आणि कोट्स, मित्र-मैत्रिणींसह नातेवाईकांना द्या गोड शुभेच्छा

Janmashtami 2024 Wishes: सध्या सोशल मीडियाचं युग आहे. त्यामुळे प्रत्येक जण अशा सण समारंभांना सोशल मीडियावर स्टेटस किंवा कोट्स लिहून आनंद व्यक्त करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देत असतात.

Ruchika Jadhav

श्रीकृष्णजन्माष्टमी या वर्षी उद्या म्हणजेच २६ ऑगस्ट २०२४ ला साजरी केली जाणार आहे. या दिवशी सर्वत्र बाळगोपाळाचा जन्मोत्सव अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. उद्या प्रत्येक घरात बाळकृष्णाची पूजा केली जाणार आहे. या पुजेवेळी सुंदर आणि गोड नैव्यद्य सुद्धा बनवला जातो. सध्या सोशल मीडियाचं युग आहे. त्यामुळे प्रत्येक जण अशा सण समारंभांना सोशल मीडियावर स्टेटस किंवा कोट्स लिहून आनंद व्यक्त करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देत असतात.

यंदा सुद्धा श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त आम्ही तुमच्यासाठी काही खास आणि सुंदर कोट्सची निवड केली आहे. सकाळी सर्वांना गुड मॉर्निंगचे मॅसेज किंवा कोट्स पाठवताना तुम्ही त्यांना हे कोट्स सुद्धा पाठवू शकता. तसेच हे सर्व कोट्स तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेटसला सुद्धा ठेवू शकता.

कृष्ण नाव आणि गोकुळ गाव

अशा भगवान श्रीकृष्णाला कोटी कोटी प्रणाम,

गोकुळाष्टमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

गोकुळात होता ज्याचा गाजावाजा, गोपिकांसोबत ज्याने केला रास,

यशोदा, देवकी होत्या त्याच्या माता, हाच संपूर्ण सृष्टीचा लाडका कृष्ण कन्हा.

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

अच्युतं केशवं राम-नारायणं

कृष्ण-दामोदरं वासुदेवं हारिम |

श्री-धरम माधवं गोपिका-वल्लभं

जानकी-नायकं रामाकैमद्रं भजे ||

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ढगांच्या आडून चंद्र हासला आकाशी चंद्र- ताऱ्यांचा रास रंगला कृष्ण जन्मला गं बाई कृष्ण जन्मला.. गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...

राधाची भक्ती, बासरीची गोडी, लोण्याचा स्वाद सर्व मिळून साजरा करू गोकुळाष्टमीचा दिवस खास, जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

कृष्ण गोविंद, गोविंद गोपाला जय मुरली मनोहर नंदलाला..! जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

कृष्णाचा जन्म झाला, आनंद हा मनी जाहला... गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा !

प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडते. गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा !

कृष्ण ज्याचं नाव गोकुळ ज्याचं धाम अशा श्री भगवान कृष्णाला आमचा शतशः प्रणाम, गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा !

गोकुळाष्टमीच्या शुभ दिवशी आमच्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभकामना, श्रीकृष्णाची कृपा तुम्हावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा !

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

SCROLL FOR NEXT