Krishna Janmashtami 2024 Information Saam TV
लाईफस्टाईल

Janmashtami 2024 Date: कधी आहे जन्माष्टमी? वाचा तारीख आणि 'या' पुजेचं महत्व

Ruchika Jadhav

कृष्ण देवाच्या पुजेसाठी जन्माष्टमी हा दिवस अतिशय शूभ मानला जातो. या दिवशी कृष्ण देवाची पुजा केल्याने मनात असलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अशात यावर्षी बाळ कृष्ण जन्माष्टमीचा दिवस काय आहे? तारीख आणि तिथी काय आहे? तसेच या पुजेचे महत्व याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

तारीख काय?

या वर्षी कृष्ण जन्माष्टमी २६ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्र असते. याचवेळी कृष्ण जन्माष्टमी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. ज्या व्यक्ती या दिवशी श्रीकृष्णाची पुजा करतात त्यांना मृत्यूलोकात स्वर्गासारखे सुख प्राप्त होते.

पुजेची योग्य पद्धत

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त पुजा करताना सकाळी सूर्योदय होण्याआधी उठावे. त्यानंतर स्नान करून व्रत करण्यासाठी प्रतिज्ञा करवी. त्यानंतर घरात असलेल्या एका छोट्या तांब्याच्या ताटात बाळकृष्णाची मूर्ती ठेवा आणि पूजा करा. तसेच श्रीकृष्णासमोर दिवा लावा. प्रसादासाठी समोर दही आणि लोणी ठेवा. पुजा करताना अगरबत्ती, कापूर, केशर यांसब हळद, कापूस, अक्षत यासर्वांचा वापर करा.

जन्माष्टमीचा कालावधी

जन्माष्टमी २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३९ वाजता सुरू होणार आहे. तर २७ ऑगस्ट रोजी दुपारी २.१९ वाजता संपणार आहे. या कालावधीमध्ये ज्या व्यक्ती व्रत आणि उपवास पाळतात त्यांना धन प्राप्तीसह मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी शक्ती मिळते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

Surat Tourism Place: नवरात्रीत बहरलं सुरत; मंत्रमुग्ध करणाऱ्या या ठिकाणांना आवश्य भेट द्या

SCROLL FOR NEXT