Manasvi Choudhary
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्णजन्मोत्सव साजरा केला जातो.
आज सर्वत्र मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होणार आहे
श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताची पूजा आणि महत्व जाणून घेऊया
जन्माष्टमी पूजेचा शुभ मुहूर्त रात्री 11.44 ते 12.29 असा आहे या शुभ मुहूर्तावर बाल गोपाळाची पूजा करावी
पूजेच्या साहित्यात भगवान श्रीकृष्णाचा पाळणा, लड्डू गोपाळ किंवा बालकृष्णाची मूर्ती, चौकी, गंगेचे पाणी, पिवळे वस्त्र, धुप अगरबत्ती, लोणी, मध, गाईचे दूध, काकडी, फळे, फुले, चंदन, हळद. कुमकुम, रक्षा, तुळस घ्यावे.
पूजेच्या पूर्वी सायंकाळी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.
सर्वप्रथम लड्डू गोपाळ श्रीकृष्णाच्या मूर्तीला गंगाजलाने स्नान घालावे.
यानंतर श्रीकृष्णाला मध, लोणी, दूध, केशर म्हणजेच पंचामृताने स्नान घालावे.
श्रीकृष्ण जन्माच्या मुहूर्तावर बाळ श्रीकृष्णाला चंदन, अक्षत, हळद, चंदनाचा टिळा लावून पाळण्यात जोजवले जाते.
श्रीकृष्णजन्माेत्सवास गाईचीही पूजा करा पूजेत लोणी, साखर मिठाई, कोथिंबीर, माखणा खीर, मिठाई नैवेद्य दाखवा
पूजेच्या शेवटी ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ हा जप करावा.