Janmashtami 2023 Recipe Saam tv
लाईफस्टाईल

Janmashtami 2023 Recipe : जन्माष्टमीला बनवा ओल्या नारळाचे लाडू; १० मिनिटात झटपट तयार, पाहा रेसिपी

Janmashtami 2023 Date : श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला जन्माष्टमी साजरी केली जाते.

कोमल दामुद्रे

Coconut Ladoo Recipe :

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला जन्माष्टमी साजरी केली जाते. ही तारीख भगवान श्रीकृष्णांची जयंती म्हणून साजरी केली जाते. यानिमित्ताने देशभरात जन्माष्टमी साजरी केली जाते. या दिवशी श्रीकृष्णाला लाडूचे ५६ भोगही दाखवण्यात येतात.

यंदा ६ सप्टेंबरला जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. यावेळी श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्त जगभर उत्सव साजरा करतात आणि लोक उपवास ठेवतात. या दिवशी लड्डू गोपाळला विविध लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो. श्रीकृष्णाला भोग दाखवण्यासाठी याप्रमाणे बनवा ओल्या नारळाचे मऊ लुसलुशीत लाडू, पाहा रेसिपी

1. साहित्य-

  • २ कप किसलेले खोबरे (coconut)

  • 1 कप दूध

  • ½ कप साखर (Sugar)

  • ¼ कप दूध पावडर

  • २ चमचे बारीक चिरलेले काजू

  • ¼ टीस्पून वेलची पावडर

  • १ चमचा तूप (Ghee)

2. कृती -

  • कढईत तूप गरम करून त्यात खोबरे घालून काही मिनिटे परतून घ्या.

  • त्यात दूध घाला आणि 5 ते 7 मिनिटे ढवळून शिजवून घ्या. नंतर त्यात साखर आणि वेलची पूड घालून मिक्स करा.

  • नंतर त्यात काजू आणि मिल्क पावडर टाकून नीट ढवळा. सर्व साहित्य एकत्र करून साधारण १-२ मिनिटे शिजवा आणि गॅस बंद करा.

  • सर्व साहित्य थंड झाल्यानंतर हातात घेऊन मध्यम आकाराचे लाडू बनवा. प्रसादासाठी नारळाचे लाडू तयार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani: दिशा पटानीचा 'सुपरबोल्ड' लूक; फोटोंनी उडवली झोप

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT