Ringworm : पावसाळ्यात ओले कपडे घातल्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे आपल्याला आरोग्याचा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यातील एक गजकर्ण.
गजकर्ण हा विशिष्ट सूक्ष्मकवकांच्या संसर्गामुळे होणारा त्वचारोग. ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरमकॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या तीन जातींच्या कवकांमुळे गजकर्ण होतो. प्रामुख्याने डोक्याची त्वचा (Skin), हाताचे तळवे, मनगटे, काखा, जांघा, मांड्या, हातापायांच्या बोटांमधील जागा इ. शरीराच्या वेगवेगळ्या भागांत हा रोग होऊ शकतो.
गजकर्ण हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य कारणे म्हणजे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई,एकमेकांचे कपडे वापरणे इत्यादी. लक्षणे हा आजार कंबर, पोट, मांडया,जांघा, इत्यादी भागांत जास्त करून होतात. यामुळे खूप खाज सुटते.
या समस्येवर मात करण्यासाठी बाजारात अनेक औषधे आणि स्किन क्रीम उपलब्ध आहेत. परंतु आज अशा अनेक नैसर्गिक टिप्स जाणून घेवूयात, ज्यांच्या मदतीने आपण फंगल इन्फेक्शनपासून सहज सुटका मिळवू शकता. पाहुयात काही घरगुती उपाय.
यावर उपाय कसा कराल - (Fungal Infection Treatment )
१. अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) -
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटी-फंगल गुणधर्म आढळतात, जे फंगल इन्फेक्शनसाठी शत्रूसारखे कार्य करतात. अॅपल सायडर व्हिनेगरच्या मदतीने कॅन्डिडा फंगल इन्फेक्शनवर देखील उपचार केले जाऊ शकतात. यासाठी कापसाचा बोळा व्हिनेगरमध्ये भिजवून प्रभावित भागावर लावा. साधारण ३ दिवसात आपले इन्फेक्शन (Infection) गायब होण्यास सुरुवात होईल.
२. कोरफड (Aloe Vera) -
कोरफडीच्या मदतीने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात हे आपणा सर्वांना माहीत आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का की फंगल इन्फेक्शनपासूनही सुटका मिळू शकते. यासाठी कोरफडीची साल काढून त्याचे जेल संसर्ग झालेल्या ठिकाणी लावा, असे दिवसातून ४ ते ५ वेळा केल्यास आपल्याला अपेक्षित परिणाम मिळेतील.
३. लसूण पेस्ट (Garlic Paste) -
फंगल इन्फेक्शनची खाज खूप त्रासदायक असते, परंतु लसणाच्या वापराने फंगल इन्फेक्शनपासून मुक्त होऊ शकता. यासाठी प्रथम लसणाच्या कळ्या वेगळ्या करून त्या मिक्सरमध्ये बारीक करा आणि त्यात खोबरेल तेलाचे काही थेंब टाकून पेस्ट तयार करा आणि प्रभावित भागात लावा. एक ते दोन तास राहू द्या. असे केल्याने फंगल इन्फेक्शनपासून मुक्ती मिळेल.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.