Manasvi Choudhary
वालाचा बिरडा ही अतिशय रूचकर भाजी आहे. वालाचे बिरडे अनेकांच्या घरी बनवले जाते. वालाचे बिरडे चविष्ट बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
वालाचे बिरडे म्हणजे मोड आलेले सोलून केलेले कडधान्य आहे. वाल हे शरीरासाठी पौष्टिक असतात.
वालाचे बिरडे बनवण्यासाठी मोड आलेले वाल, कांदा, टोमॅटो, आलं- लसूण पेस्ट, हळद, धनापावडर, जिरा पावडर, मसाला, गरम मसाला, मीठ आणि कांदा खोबऱ्याचे वाटण हे साहित्य एकत्र करा.
वालाचे बिरडे बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एका पातेल्यात गरम तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घ्या.
कांदा सोनेरी रंगाचा झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, हळद, धना पावडर, जिरा पावडर, लाल मसाला आणि गरम मसाला टाका.
आता या मिश्रणात मसाला वाटण मिक्स करा आणि परतून घ्या नंतर यात मोड आलेले वाल मिक्स करा त्यात चवीनुसार मीठ टाका.
वालाची भाजी शिजण्यासाठी त्यावर झाकण लावून झाकणावर थोडेसे पाणी ठेवा. थोड्यावेळाने हे गरम झालेले पाणी मिश्रणात मिक्स करा आणि भाजी चांगली शिजवून घ्या, अशाप्रकारे वालाचा बिरडा ही रेसिपी तुमची तयार होईल.