Matki Rassa Bhaji: गावरान स्टाईल झणझणीत मटकीची रस्सा भाजी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

मटकीची रस्सा भाजी

मटकीची रस्सा भाजी खायला अत्यंत चविष्ट लागते. घरोघरी मटकीची भाजी बनवली जाते. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच मटकीची भाजी खायला आवडते. मटकीची भाजी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Matki Rassa Bhaji | Social Media

बनवण्याची पद्धत सोपी

तुम्ही घरीच अत्यंत सोप्या पद्धतीने मटकीची भाजी बनवू शकता. नेमकी प्रोसेस आणि साहित्य काय लागते हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Matki Rassa Bhaji | Social Media

साहित्य

मटकीची भाजी बनवण्यासाठी मोड आलेली मटकी, मसाला, हळद, कांदा, टोमॅटो, मीठ, कोथिंबीर, लसूण हे साहित्य घ्या.

Matki | yandex

फोडणी द्या

सर्वात आधी कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे, मोहरी आणि हिंग याची फोडणी द्या. नंतर या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या.

Fodni

मसाले मिक्स करा

मिश्रणात लसूण पेस्ट, हळद, मसाला हे मसाले मिक्स करून यात मोड आलेली मटकी घाला. भाजीमध्ये थोडेसे पाणी घालून भाजी शिजण्यासाठी झाकण लावा.

spices | Social Media

भाजी नीट शिजवा

चवीनुसार मिश्रणात मीठ घाला आणि त्यावर पाणी घालून रस्सा तयार करा आणि झाकण ठेवून मटकी पूर्णपणे शिजेपर्यंत शिजवा.

Matki Rassa Bhaji | Social Media

गावरान स्टाईल मटकीची रस्सा भाजी तयार

अशाप्रकारे घरीच गावरान स्टाईल मटकीची रस्सा भाजी तयार होईल.

Matki Rassa Bhaji | Social Media

Next: Chavali Batata Rassa Bhaji Recipe: आचारी स्टाईल चवळी बटाटा रस्सा भाजी कशी बनवायची?

येथे क्लिक करा...