Chavali Batata Rassa Bhaji Recipe: आचारी स्टाईल चवळी बटाटा रस्सा भाजी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

चवळी बटाटा रस्सा भाजी

चवळी बटाटा रस्सा भाजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही अगदी साध्या पद्धतीने घरीच आचारी स्टाईल चवळी बटाटा रेसिपी बनवू शकता.

Chavali Batata Rassa Bhaji Recipe

साहित्य

चवळी बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी तुम्हाला चवळी, बटाटा, कांदा, टोमॅटो, ओला खोबरा, आलं - लसूण, कढीपत्ता, तेल, मोहरी, जिरे , हळद, मसाला, कोथिंबीर , मीठ हे साहित्य एकत्र करा.

Chavali Batata Rassa Bhaji Recipe

चवळी स्वच्छ धुवा

सर्वात आधी चवळी बटाटा रस्साभाजी बनवण्यासाठी चवळी आणि बटाटे स्वच्छ धुवून घ्या. बटाट्याचे चौकोनी आकारात तुकडे करा.

Chavali Batata Rassa Bhaji Recipe

फोडणी द्या

गॅसवर एका पातेल्यात गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता याची फोडणी द्या. या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या.

Chavali Batata Rassa Bhaji Recipe

टोमॅटो मिक्स करा

मिश्रणात आलं - लसूण पेस्ट मिक्स करा. यानंतर यामध्ये टोमॅटो घालून संपूर्ण मिश्रण चांगले शिजवून घ्या. हळद, मसाला आणि चवीनुसार मीठ घाला नंतर यात चवळी

Chavali Batata Rassa Bhaji Recipe

मिश्रण एकजीव करा

बटाटे घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करा. आवश्यकतेनुसार या मिश्रणात पाणी घाला आणि त्यावर झाकण ठेवा. भाजी चांगली शिजल्यानंतर यावर कोथिंबीर घालून सर्व्हसाठी रेडी करा.

Chavali Batata Rassa Bhaji Recipe

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Next :Beed Tourist Places: धार्मिक अन् सांस्कृतिक वारसा लाभलेल्या बीड जिल्ह्यातील या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

येथे क्लिक करा...