महिला असो वा पुरुष प्रत्येकालाच जाड लांब केस आवडतात. सध्याच्या वातावरणाचा परिणाम थेट प्रत्येकाच्या केसांवर होतो. काहींचे लहान वयातच केस पांढरे होतात, काहींचे केस गळतात, काहींचे केस वाढतच नाहीत. लांबसडक, दाट केस ही सौंदर्याची व आत्मविश्वासाची ओळख मानली जाते. महागड्या ट्रीटमेंट्स आणि प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी रोजच्या साध्या सवयींनी देखील केसांची वाढ करु शकता. यासाठी सकाळी काही गोष्टींचा अवलंब केला तर केस निरोगी, दाट आणि मजबूत होतात.
केसांची काळजी घेण्यासाठी काही उपाय
१. सकाळी उठताच पाणी पिणे.
कोमट पाणी किंवा लिंबूपाणी, तसेच रात्री भिजवलेले मेथी दाण्यांचे पाणी केसांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि केसांच्या मुळांपर्यंत पोषणद्रव्ये पोहोचतात.
२. प्रोटीन असलेला नाश्ता करा.
केस हे ‘केराटिन’ या प्रोटीनपासून तयार होतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात अंडी, ओट्स, सुका मेवा किंवा मोड आलेली कडधान्ये जरूर खा. बदाम व पालकासारख्या पौष्टीक पदार्थांचा समावेश केल्याने केसगळती कमी होते.
३. डोक्याची मालिश करा.
सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी पाच मिनिटं बोटांच्या टोकांनी डोक्याची हलकी मालिश करा. यामुळे ताण कमी होतो, रक्तप्रवाह वाढतो आणि केसांची मुळं मजबूत होतात. आठवड्यातून एक- दोनदा नारळ किंवा बदाम तेलाचा हलका मसाज केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतो.
४. उन्हापासून केस वाचवा.
जसा त्वचेला उन्हाचा त्रास होतो, तसंच केसांनाही होतो. बाहेर पडताना केसांना स्कार्फने झाका किंवा नैसर्गिक लीव्ह-इन कंडिशनर वापरा. यामुळे केस कोरडे होणे आणि तुटणे टळते.
५. घट्ट हेअरस्टाईल टाळा
सकाळी घट्ट पोनीटेल किंवा बन बांधल्याने केस तुटतात आणि गळायला लागतात. त्याऐवजी मोकळे केस किंवा सैल वेणी ठेवा.
६. सकाळची शांत सुरुवात
ताण हा केसगळतीचा मोठा कारणीभूत घटक आहे. त्यामुळे सकाळची सुरुवात योगा, ध्यान किंवा प्राणायामाने करा. शांत मनामुळे टाळू निरोगी राहतो आणि केसांची वाढ सुधारते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.