Sakshi Sunil Jadhav
चपाती हा महाराष्टातील प्रत्येक घरात बनवला जाणारा पदार्थ आहे.
चपात्या रोजच्या आहाराचा भाग असल्यामुळे प्रत्येकालाच त्या बनवाव्या लागतात.
काही वेळेस सकाळच्या चपात्या दुपारच्या जेवणापर्यंत वातड किंवा कडक होतात.
पुढे आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत, ज्याने तुमच्या चपात्या ४८ तास मऊसुत राहतील आणि टम्म फुगतील.
सगळ्यात आधी गव्हाचं पीठ बारिक चाळणीने चाळून घ्या. काहीवेळेस त्यात कोंडा असतो.
कणीक मळताना पीठात पाण्यासोबत तेलाचा किंवा तूपाचा वापर करा. याने चपात्या चांगल्या फुलतात आणि मऊसुत राहतात.
कणीक मळताना कधीच थंड पाण्याचा वापर करु नये. याने चपात्या वातड ओतात आणि लाटताही येत नाहीत.
चपाती तयार करण्यापुर्वी पीठ १५ मिनिटं झाकून ठेवा. कारण त्यामध्ये ग्लुटेन असतं.