Bhaubij 2024 SAAM TV
लाईफस्टाईल

Bhaubij 2024: आजच्या दिवशी तुमचा भाऊ तुमच्यापासून दूर आहे? कशी कराल भाऊबिज साजरी, पाहा मुहूर्त, नियम

Bhaubij 2024: आजच्या काळात भाऊ बिजेच्या दिवशी प्रत्येक भावा-बहि‍णींना भेटणं शक्य नसतं. भाऊ किंवा बहिण परदेशात असल्याने त्यांना भेटून हा दिवस साजरा करता येत नाही.

Surabhi Jayashree Jagdish

आज भाऊबिज असून हा दिवाळीचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करतात. या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. तसंच दिवशी बहीण भावाच्या कपाळावर टिळा लावून भाऊ बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो.

या दिवशी भाऊ आणि बहीण दोघंही एकमेकांना भेटतात आणि जेवण देखील करतात. पण आजच्या काळात भाऊ बिजेच्या दिवशी प्रत्येक भावा-बहि‍णींना भेटणं शक्य नसतं. भाऊ किंवा बहिण परदेशात असल्याने त्यांना भेटून हा दिवस साजरा करता येत नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला हा दिवस कसा सेलिब्रेट केला पाहिजे ते जाणून घेऊया.

भाऊ दूर असेल तर कशी करावी पुजा?

  • सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून छान स्वच्छ कपडे घाला.

  • बाजारातून तुमच्या भावाच्या नावाने एक नारळ खरेदी करा.

  • घराच्या मंदिरात लाकडी स्टूल ठेवा. स्टूलवर पिवळे कापड पसरवा.

  • या पिवळ्या कपड्यावर गुलाब किंवा कुंकवाने अष्टकोनी कमळाचे चित्र काढा.

  • अष्टकोनी कमळावर नारळ स्थापित करा.

  • आता नारळावर रोळीसह टिळा लावून त्यावर तांदूळ चिकटवा.

  • फुलं, फळं आणि मिठाई अर्पण केल्यानंतर त्या नारळाची आरती करा.

  • आरतीनंतर नारळ पिवळ्या कापडाने झाकून ठेवावा.

वैदिक पंचांगानुसार, पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची दुसरी तिथी ३ नोव्हेंबर रोजी रात्री १०:०१ वाजता समाप्त होणार आहे. यावेळी पुजेचा शुभ मुहूर्त या दिवशी दुपारी 1:05 पासून सुरू होणार असून तो दुपारी 3:20 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे पूजेची शुभ वेळ सुमारे 2 तास 10 मिनिटं असणार आहे.

डिस्क्लेमर- आम्ही असा दावा करत नाही की या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

SCROLL FOR NEXT