भाऊबीज हा सण हिंदू धर्मात खूप पवित्र मानला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि त्याच्या हातात गोंडा बांधते त्यांचे रक्षण करण्याचे अनंतकाळचे वचन देते. तेव्हा दोघे एकमेकांना छान भेटवस्तु देतात. भाऊबीज हा सण बहिण आणि भावामधल्या प्रेमाच्या नात्याचे प्रतीक म्हणून संबोधला जातो.
पाच दिवसांच्या दिवाळी सणाच्या शेवटच्या दिवशी भाऊबीज हा साजरा केला जातो. यंदा ३ नोव्हेंबर २०२४ ला भाऊबीज हा सण साजरा केला जाणार आहे. तर यंदाच्या भाऊबीजेचा मुहूर्त आणि काही महत्वाच्या गोष्टींची माहिती पुढे देण्यात आली आहे.
भाऊबीजेची तारीख आणि मुहूर्त
ज्योतिषशास्त्रानुसार भाऊबीज ३ नोव्हेंबर २०२४ ला करु शकता. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची दुसरी तिथी ०२ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८.२१ वाजता सुरू होईल. तथापि, ही तारीख ०३ नोव्हेंबर २०२४ रोजी संपेल.
कॅलेंडर पाहता, यावर्षी भाई दूजचा सण रविवार, ३ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरा केला जाणार आहे. यासोबतच या दिवशी ओवाळणी करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी ०१.१० ते ०३.२२ पर्यंत असेल.
काही महत्वाच्या टिप्स
पुढील पाच आवश्यक गोष्टी ताटात न विसरता ठेवा.
अक्षता म्हणजेच तांदूळ आरतीच्या ताटात नक्की ठेवा. शक्यतो तांदूळ तुटलेले किंवा बारिक कणीचे नसावेत. त्याचसोबत हळद- कुंकू खूप महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. तसेच दिवा , गोड पदार्थ आणि नारळ.
नारळ ताटात ठेवण्यामागचे कारण म्हणजे यमुनेने तिच्या भावाला एक नारळ दिला होता. तेव्हा ती भावाला म्हणाली , मला भेटायला येताना नारळ घेवून येशील हा नारळ तुला माझी सतत आठवण करुन देईन.
भाऊबीजेच्या दिवशी बहिणीच्या घरी जेवा
असे मानले जाते की, भाऊबीजेच्या दिवशी लग्न झालेल्या बहिणींनी आपल्या भावांना त्यांच्या घरी जेवायला बोलावले पाहिजे. या दिवशी आपल्या भावांना जेवायला बोलावणाऱ्या बहिणींच्या घरात कधीही गरिबी येत नाही. तसेच देवी लक्ष्मीची कृपा त्यांच्या घरावर कायम राहते.
Writter By: Sakshi Jadhav