भाऊबीजेला सगळ्या भांवडांना पडणारा एक सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे, 'एकमेकांना गिफ्ट काय द्यायच?' जे आपल्या खिशाला परवडेल आणि गिफ्ट सुंदर असेल. याच प्रश्नाचा विचार करुन आम्ही काही गिफ्टचे पर्याय तुमच्यासाठी आणले आहेत.
प्रत्येक भावाने आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तु दिली की तिच्या चेहऱ्यावरचा आंनद काही वेगळाच असतो. तसेच भावंडामध्ये कितीही भांडणं असली त्यांच्यातले प्रेम हे न संपणारे असते. या दिवाळीत तुम्ही काही सुंदर भेटवस्तू देवून तुमच्या बहिणीला खूश करु शकता.
ब्रेसलेट
सध्या मुली हातात बांगड्या घालत नाही. त्याऐवजी ब्रेसलेट घालणे पसंत करतात. तुम्ही यात चांदी, सोने, साधे म्हणजेच तुमच्या खिशाला परवडेल असे गिफ्ट देवू शकता. हे गिफ्ट रोजच्या वापरासाठी असे सुद्धा आहे. तुम्ही ब्रेसलेट घेताना सुरेख नाजूक डिजाइनचे गिफ्ट घेवू शकता.
कस्टमाईज्ड लॉकेट
तुम्ही सोन्याचे दागिने बहिणीला द्यायचा विचार करत असाल तर कस्टमाईज्ड लॉकेट हा एक उत्तम पर्याय आहे. यात तुम्ही हव्या त्या अक्षराचे लॉकेट देवू शकता. याची डिजाइन जितकी नाजूक असेल तितके ते दिसायला सुंदर दिसते. चैन आणि लॉकेट हे मुलींच्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहे.
अंगठी
तुमच्या बजेटनुसार तुम्ही बहिणीला सुंदर अंगठी देवू शकता. जर तुमच्या बहिणीला आर्थिक समस्या सतावत असतील तर तुम्ही रत्नांची अंगठी देवू शकता. त्याने तुमच्या बहिणीच्या अडचणी दूर होतील. अंगठीचा वापर बहिण रोज करु शकते. अशा वापरातल्या आणि महिलांच्या आवडीच्या गोष्टी भाऊबीजेला तुम्ही भेट म्हणून देवू शकता.
इतर वस्तु
तुम्ही भाऊबीजेला मेकअप मधील काही वस्तु देवू शकता, बॅग देवू शकता, एखादा छान ड्रेस देवू शकता, शुज देवू शकता, झुमका, साखळ्या अशा अनेक पद्धचे गिफ्ट्स देवू शकता. भेटवस्तु देताना नेहमी वापरता येतील अशा पद्धतीच्या भेटवस्तु द्याव्या.
Written By : Sakshi Jadhav