लाईफस्टाईल

Fertility Signs: तुमचं शरीर आई होण्यास आहे तयार? हाय फर्टाइल महिलांमध्ये दिसून येतात ही लक्षणं

Natural Signs Your Body Is Ready For Pregnancy: महिलांच्या शरीरात काही नैसर्गिक बदल होत असतात जे त्यांच्या फलनक्षमतेचे संकेत देतात. हे बदल योग्य वेळी ओळखले तर गर्भधारणेची शक्यता वाढते.

Surabhi Jayashree Jagdish

आई होणं हे प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं. जेव्हा आपण फर्टिलीटीबाबत बोलतो तेव्हा चाचण्या, उपचार किंवा नियमित मासिक पाळी इतकीच चर्चा मर्यादित असते. मात्र तुम्हाला माहितीये का तुमची रिप्रोडक्टिव सिस्टम योग्य पद्धतीने काम करत असल्याचे संकेत तुमचं शरीर तुम्हाला देत असतं.

शरीर आपल्याला देत असलेलं हे संकेत इतके सूक्ष्म असतात की स्त्रिया अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतात. ही लक्षणं महिलांना अनेकदा एखाद्या समस्येची लक्षणं वाटू लागतात. प्रत्यक्षात हे बदल शरीराच्या नॅचरल फर्टाइल रिदमचा भाग असतात. ही लक्षणं कोणती आहेत ते जाणून घेऊया.

मासिक पाळीच्या काळात एनर्जी वाढणं

अनेक महिलांना मासिक पाळीच्या काळात अचानक जास्त एनर्जी जाणवू लागते. हा फक्त एक चांगला दिवस नाही तर ते ओव्हुलेशनचं लक्षण असू शकतं. या काळात इस्ट्रोजेन हार्मोन्स पीकवर असतात. जे शरीराला गर्भधारणेसाठी तयार करतात.

रात्रीच्या वेळी शरीर गरम वाटणं

ओव्हुलेशननंतर शरीराचं तापमान काही प्रमाणात वाढू लागत. यावेळी सकाळी किंवा रात्री उठल्यावर हा बदल दिसतो. यामध्ये स्त्रियांचं शरीर काहीसं गरम वाटू लागतं. स्त्रिया बहुतेकदा हवामान किंवा थकवा याला कारणीभूत मानतात. परंतु ते शरीराच्या फर्टाइल विंडोचं लक्षण असतं.

ओटीपोटात सौम्य वेदना

मासिक पाळीव्यतिरिक्त जर तुम्हाला ओटीपोटात सौम्य वेदना जाणवत असतील तर त्या ओव्हुलेशनशी संबंधित असू शकतात. याला वैद्यकीय भाषेत मिटेलश्मेर्झ म्हणतात. ज्यावेळी ओव्हरीमधून अंडी बाहेर पडतात तेव्हा हे घडतं. बहुतेकदा याकडे किरकोळ गॅस किंवा पोटदुखी म्हणून पाहिलं जातं.

सर्वायकल म्यूकसमध्ये बदल

ओव्हुलेशनच्या जवळपास गर्भाशयाच्या मुखातील द्रवात काहीसा बदल दिसून येतो. ज्यामुळे स्पर्म्सची हालचाल होण्यास मदत होते. अनेक स्त्रिया याला संसर्ग किंवा हार्मोन्स इबॅलन्स समजतात.

तज्ज्ञ काय म्हणतात?

डॉक्टरांच्या मते, प्रजनन क्षमता समजून घेणं नेहमीच सोपं नसतं. अनेक लक्षणं इतकी सामान्य वाटतात की महिला त्यांना दुर्लक्ष करतात. ही लक्षणं अनेकदा दैनंदिन जीवनाचा भाग वाटतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात झेंडावंदनाची तयारी करत असतानाच मुख्याध्यापकाचा धक्कादायक मृत्यू

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीमध्ये Wild card एन्ट्री; 'त्या' स्पर्धकाला पाहताच सदस्यांना बसला 440 व्होल्टचा धक्का| VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दिलासा, eKYC साठी मिळणार मुदतवाढ?

Heart Attack कमी तरी मृत्यूचं कारण तेच! या सवयी हृदयासाठी घातक, डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक कारण

Chandra Grahan 2026: पहिलं चंद्रग्रहण कधी लागणार? भारतात सूतक पाळावं लागेल का जाणून घ्या

SCROLL FOR NEXT