Healthy Food: घरातील हेल्दी खाऊनही वाढतंय तुमचं वजन? तुमच्या या चुकीच्या सवयी ठरतायत कारणीभूत

weight gain after eating healthy food: अनेकजण घरच्या घरी आरोग्यदायी आहार घेत असूनही वजन वाढत असल्याची तक्रार करतात. यामागे आहारातील पोषणमूल्य कमी नसून जीवनशैलीतील काही चुकीच्या सवयी कारणीभूत ठरतात.
weight gain after eating healthy food
weight gain after eating healthy foodSaam Tv
Published On

आजच्या घडीला आपण प्रत्येकजण फीटनेसच्या बाबतीत जागरूक आहे. त्यामुळे बरेचजण वजन कमी करण्याच्या मागेही लागतात. त्यामुळे आपण बाहेरचं जंक फूड सोडून घरातील हेल्दी पदार्थ खाण्यावर भर देतात.

मात्र असं असूनही अनेकजण वजन कमी होत नसल्याची तक्रार करतात. ही परिस्थिती खूपच त्रासदायक असू शकते. पण हेल्दी खाल्ल्यानंतरही वजन का वाढतंय याची कारणं आपण जाणून घेऊया.

कॅलरी काऊंट

सर्वात मोठा गैरसमज असतो तो म्हणजे, कमी कॅलरीज. उदाहरणार्थ, नट, एवोकॅडो, ऑलिव्ह ऑइल आणि डार्क चॉकलेट हे खूप आरोग्यदायी असतात. परंतु त्यामध्ये कॅलरीज देखील खूप जास्त असतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही जितक्या कॅलरीज बर्न करता त्यापेक्षा कमी कॅलरीज खाव्या लागतील. याचाच अर्थ तुम्हाला कॅलरी काऊंटवर लक्ष द्यावं लागेल.

weight gain after eating healthy food
Brain Tumor Early Symptoms : ब्रेन ट्यूमरच्या सुरूवातीच्या स्टेजमध्ये शरीरात दिसतात हे 6 मोठे बदल; लक्षण ओखळून लगेच डॉक्टरकडे जा

हेल्दी फूडमध्ये लपलेली साखर

मार्केटमध्ये मिळणारे अनेक पदार्थ, जसं की कमी लो फॅट योगर्ट मल्टीग्रेन बिस्किटं किंवा प्रोटीन बार या गोष्टी हेल्दी असल्याचा दावा करण्यात येतो. मात्र यामध्ये साखर आणि त्यांची चव वाढवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह्ज मोठ्या प्रमाणात असतात. यांचं सेवन केल्याने शरीरात इन्सुलिन वाढतं. परिणामी शरीरातील फॅटही वाढू शकतं.

हार्मोनल असंतुलन

अनेकदा वजन वाढण्याचं कारण तुमच्या ताटात नसून शरीरात असतं. थायरॉईड समस्या, PCOS आणि वाढलेल्या कोर्टिसोल पातळी मेटाबॉलिझ्म मंदावू शकतं. अशावेळी कमी जेवल्यानंतरही व्यक्तीचं वजन वाढू शकतं.

weight gain after eating healthy food
Kidney cancer: ही ७ लक्षणं दिसली तर समजा किडनीचा कॅन्सर शरीरात करतोय घर; लगेच करून घ्या तपासणी

अपुरी झोप आणि ताणतणाव

अपुरी झोप झाल्यास भूकेचं नियमन करणाऱ्या घ्रेलिन आणि लेप्टिन या हार्मोन्सवर थेट परिणाम होतो. ज्यावेळी तुम्ही कमी झोपता तेव्हा तुमच्या शरीराला गोड पदार्थ आणि हाय कार्ब्स पदार्थ खाण्याची इच्छा होते. तणावामुळे शरीर कॉर्टिसोल स्रवलं जातं. जे चरबी जमा होण्यास जबाबदार असतं.

लिक्विड कॅलरीकडे दुर्लक्ष करणं

लोक बऱ्याचदा त्यांच्या जेवणातील कॅलरीज मोजतात. मात्र ते लिक्विड कॅलरीजची गणना करत नाही. अशावेळी घरगुती फ्रुट ज्यूस, नारळ पाणी किंवा निरोगी स्मूदीजमध्ये कॅलरीज जास्त असतात. ज्यूस केल्याने फळांमधील फायबर निघून जातं आणि फक्त साखर राहतं. ज्यामुळे वजन वाढू लागतं.

weight gain after eating healthy food
ITR Filling: CA शिवाय आयटीआर फाइल करता येतो का? जाणून घ्या सोपी पद्धत; वेळ अन् पैसा दोन्ही वाचेल

मेटाबॉलिझम स्लो होणं

वयानुसार मेटाबॉलिझम प्रक्रिया स्लो होतो किंवा स्नायूंचं प्रमाण कमी होतं. जर तुम्ही फक्त आहारावर लक्ष केंद्रित केलं आणि व्यायाम केला नाही तर तुमचं शरीर कॅलरीज जास्त प्रमाणात बर्न करू शकणार नाही.

weight gain after eating healthy food
Weight Loss Tips: जीम किंवा डाएट न करताही अडीच महिन्यात कमी करू शकता 10 किलो वजन; डॉक्टरांनी सांगितले ३ सोपे उपाय

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com