Dengue Fever Saam Tv
लाईफस्टाईल

Dengue Fever: प्लेटलेट्स नॉर्मल असूनही डेंग्यूचा धोका असतो का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Dengue can be dangerous with normal platelet count: डेंग्यूमध्ये फक्त प्लेटलेट्स कमी होणं धोकादायक नसतं. प्लाझ्मा लीकेज, रक्तस्राव, श्वास घेण्यास त्रास आणि तीव्र अशक्तपणा यांसारखी गंभीर लक्षणंही जीवघेणी ठरू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

डेंग्यूबद्दल लोकांमध्ये सर्वात मोठा गैरसमज हा आहे की, जेव्हा रुग्णाच्या प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होतेतेव्हाच हा आजार धोकादायक बनतो. मात्र यामध्ये किती सत्य आहे हे पाहूयात. आज नॅशनल डेंग्यू दिनाच्या निमित्ताने हे जाणून घेऊया.

मेदांता नोएडाच्या इंटर्नल मेडिसिन विभागाचे सहयोगी सल्लागार डॉ. सौरदीप चौधरी यांच्या मते , लोक अनेकदा केवळ प्लेटलेटच्या संख्येवर भर देतात. मात्र यावेळी ते गंभीर आजार दर्शवणाऱ्या इतर महत्त्वाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. खरं तर, प्लेटलेट्स सामान्य असतानाही डेंग्यू धोकादायक ठरू शकतो.

डेंग्यूचा प्रसार

एडीस डासांच्या चाव्यामुळे पसरणाऱ्या डेंग्यू व्हायरसचा प्रत्येक रुग्णावर वेगवेगळा परिणाम होतो. या आजाराची तीव्रता केवळ प्लेटलेटच्या संख्येवर अवलंबून नसते. अनेक रुग्णांना, प्लेटलेटची संख्या सामान्य असूनही, प्लाझ्मा लीकेज, रक्तस्राव, यकृताच्या समस्या, श्वसनाच्या समस्या यांसारखी गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

केवळ रिपोर्टमधील प्लेटलेटच्या संख्येवर अवलंबून न राहता रुग्णाच्या संपूर्ण आरोग्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. यामध्ये काही धोक्याची चिन्हं आहेत ज्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. यामध्ये सतत उलट्या होणं, तीव्र पोटदुखी, प्रचंड अशक्तपणा, अस्वस्थता, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्त्राव आणि श्वास घेण्यास त्रास होणं यांचा समावेश आहे.

ताप उतरला म्हणून डेंग्यूचा रुग्ण बरा झाला असं नाही

रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की, ज्यावेळी ताप कमी होऊ लागतो तेव्हा डेंग्यूचा सर्वात गंभीर टप्पा सुरू होतो. हा काळ साधारणपणे आजाराच्या तिसऱ्या ते सातव्या दिवसादरम्यान येतो. बहुतेक लोकांना वाटतं की, ताप कमी होतोय म्हणजे रुग्ण बरा होतोय. पण प्रत्यक्षात हाच तो काळ असतो जेव्हा रुग्णावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असते.

सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच

पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय स्वतःहून औषधोपचार करणं टाळा. विशेषतः आयबुप्रोफेन किंवा ॲस्पिरिनसारखी औषधं थेट स्वतःच्या मर्जीने घेऊ नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

Mumbai To Pandharpur : विठ्ठलाच्या दर्शनाला 'पंढरपूर'ला जाताय? मुंबईहून जाण्यासाठी पाहा एकदम सोप्पा मार्ग

Sunday Horoscope : कामातील अडचणी वाढतील; 5 राशींच्या व्यक्तींनी खर्चावर ठेवा नियंत्रण, वाचा उद्याचे राशीभविष्य

VIRAL VIDEO : डोळ्यांदेखत मगरीनं त्या मुलाला नदीत खेचलं अन्...काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल, बघून हादराल!

Uddhav Thackeray: तुम्ही कोणाच्या बाजुने, हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं का? उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना सवाल

SCROLL FOR NEXT