Shreya Maskar
तरुण प्रौढांमध्ये (वय २०-४०) उच्च रक्तदाब ही एक वाढती समस्या आहे. यामागे प्रामुख्याने बदलती जीवनशैली हा मुख्य घटक आहे. तसेच लठ्ठपणा, मीठ , ताण आणि व्यायामाचा अभाव ही कारणे आहेत.
२५ पेक्षा जास्त बॉडी मास इंडेक्स (BMI) धोक्याचे लक्षण आहे. अतिरिक्त वजनामुळे हृदय, मूत्रपिंड आणि रक्तवाहिन्यांवर दाब वाढतो. ज्यामुळे बीपीची समस्या उद्भवते.
तरुणाई कॉलेज, ऑफिसमध्ये बराच वेळ डेस्कवर एकाच पोजीशनमध्ये बसते. मर्यादित शारीरिक हालचाल आणि स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे, यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडते.
आजकालच्या मुलांना प्रचंड मानसिक ताण असतो. कामाचे टेन्शन असते. आर्थिक अडचणी आणि चिंता यांमुळे तणाव संप्रेरकांची पातळी वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो.
धूम्रपान, मद्यपान यांमुळे रक्तदाब त्वरित वाढतो. आजकाल धूम्रपान-मद्यपान करण्यात तरुणाईची संख्या वाढली आहे. नियमित आणि जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने उच्च रक्तदाबाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे धूम्रपान-मद्यपान करणे टाळा.
झोपेचे अनियमित चक्र, रात्री उशिरा गॅजेट्सचा वापर यामुळे झोप पूर्ण होत नाही. यामुळे चिडचिड होते, परिणामी रक्तदाब वाढतो.
कुटुंबात कोणाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्यांच्या मुलांनाही हा त्रास होऊ शकतो. बीपी कायम नियंत्रणात ठेवण्यासाठी हेल्दी खा, आनंदी रहा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.