High Blood Pressure : खतरनाक आहेत हाय BP ची 'ही' ५ लक्षणे, दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरेल

Shreya Maskar

सकाळची डोकेदुखी

जर तुम्हाला सकाळी उठल्यावर तीव्र डोकेदुखी होत असेल, तर त्याला किरकोळ डोकेदुखी समजू नका. ही समस्या कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते.

Morning Headaches | pinterest

श्वास घेण्यास अडचण

जर तुम्हाला धाप लागत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे देखील उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे.

Difficulty Breathing | pinterest

चक्कर येणे

उठल्यावर तुम्हाला अचानक चक्कर येत असेल, याचा अर्थ असा होऊ शकतो की, तुमच्या मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होत नाही. असे वारंवार होत असल्यास ही बाब गंभीर आहे.

Dizziness | pinterest

नाकातून रक्त येणे

जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय सतत नाकातून रक्त येत असेल तर ते उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते. त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Nosebleeds | pinterest

थकवा जाणवणे

उच्च रक्तदाबामुळे सतत थकवा येतो. एका ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात अडचण येतात. अचानक विस्मरण होऊ शकते.

Feeling Fatigued | pinterest

हृदयाचे आरोग्य बिघडणे

हृदयाचे ठोके अचानक वाढणे हे देखील उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे. जेव्हा रक्तदाब खूप वाढतो, तेव्हा हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो, ज्यामुळे ठोके वेगवान होऊ शकतात.

Heart health | yandex

लक्षणे

तीव्र छातीदुखी, अंधुक दृष्टी , डोकेदुखी, पोटात मळमळ, उलट्या, धाप लागणे, अचानक अशक्तपणा आणि झटके येणे, ही सर्वच उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत.

Symptoms | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : 'या' ५ चुकींमुळे BP मोजताना येते चुकीचे रीडिंग, वाचा रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत

High Blood Pressure | pinterest
येथे क्लिक करा...