Ration Card : रेशनकार्डमध्ये नावं आहे का नाही? Mobile वरती कसं चेक कराल; वाचा सविस्तर
Ration Card : रेशनकार्डमध्ये नावं आहे का नाही? Mobile वरती कसं चेक कराल; वाचा सविस्तर Saam TV
लाईफस्टाईल

Ration Card : रेशनकार्डमध्ये नावं आहे का नाही? Mobile वरती कसं चेक कराल; वाचा सविस्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : रेशनकार्ड हे सर्व नागरिकांना सरकारने दिलेलं एक दस्तऐवज आहे. या दस्तऐवजाद्वारे गरिबांना रेशनिंगचे धान्य दिले जाते हे तर आपणाला माहित आहे. तसंच या रेशन कार्डचा उपयोग आपणाला अनेक ठिकाणी केला जातो ते एक अत्यंत महत्वाचे दस्तऐवज आहे. ते ओळखीसाठी, नागरिकत्वाचा पुरावा, पत्त्याचा पुराव्यासाठीही याचा वापर केला जातो.

शिवाय आपलं एखादं खात बॅकेत (Bank Account) उघडायचे असले तरी ओळखपत्र म्हणून रेशनकार्डचा वापर केला जातो. शिवाय आपणाकडे एखादया वेळेस आधार कार्ड (Adhar Card) नसेल तर त्या वेळी आपण रेशन कार्ड वापरू शकतो.

मात्र याच रेशन कार्डवरुन (Ration card) अनेक वेळा आपण गावाकडे किंवा शहरामध्येही वाद झालेले पाहतो. ते आपले नावं शिधावाटप यादीतून नाव काढल्यामुळे. कारण आपण एकत्रीत कुटुंबातून विभक्त राहीलो किंवा आपल्या घरातील नवीन सदस्यांचे नावं त्यामध्ये वाढविले नाही तर आपणाला या समस्यांना सामोरं जावं लागत. आणि या सर्व समस्यांना आपण घरबसल्या सोडवू शकतो कारण रेशन कार्डवरती आपले नावं आहे की नाही ते नाव कसे तपासायचे हे तुम्ही स्वत: चेक करु शकतो. आणि यासाठी तुम्हाला पहिल्यांदा केंद्र शासनाच्या NFSA च्या संकेतस्थळावरती जावं लागेल.

त्यानंतर पुढील पर्याय निवडत जा -

प्रथम यासाठी अधिकृत वेबसाइट https://nfsa.gov.in/Default.aspx वरती जा. त्यामध्ये गेल्यानंतर उजव्या बाजुला असनारा होमपेज वरील रेशन कार्ड हा पर्याय निवडा आणि त्यानंतर Ration Card Details On State Portals या पर्यायावर क्लिक करा.

तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही आधी राज्य नंतर जिल्हा त्यानंतर ब्लॉकचे नाव टाकल्यानंतर पंचायतीचे नाव टाका आणि त्यानंतर रेशन दुकानदाराचे नाव आणि रेशनकार्ड कोणत्या प्रकारचे आहे ते निवडले की आपल्या समोर नावांची यादी येईल, जी शिधापत्रिकाधारकांची आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे नाव या यादीत पाहू शकता.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Scheme For Women: महिलांनो, स्वतः चा व्यवसाय सुरु करायचाय? सरकारच्या 'या' योजनेत मिळेल कर्ज

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना

Today's Marathi News Live: भिंडेच्या कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग

SCROLL FOR NEXT