मुंबई : सध्याच्या Digital युगामध्ये आपणाला कोणताही व्यवहार करायचा असल्यास 'आधार कार्ड'चा आधार घ्यावाच लागतो मग ते बँके संदर्भातील कामं असोत वा शाळा कॉलेजमधील अॅडमिशन असोत किंवा कोरोना लसीकरण (Corona vaccination) आधार कार्ड किती महत्वाच आहे याची जाणीव आपणाला या उदाहरणांवरुन होऊ शकते. मात्र ह्याच आधारकार्ड मुळे आपली फसवणूक देखील होऊ शकते हे देखील आपणाला रोजच्या बातम्यांमधुन समजतेच त्यामुळे या आधार कार्डला आपण सुरक्षित कसं ठेवू शकतो याबाबत जाणून घेऊया.
आधार कार्ड हे शासकीय कागदपत्रांमधलं अतिशय महत्त्वाचे कागदपत्र असून याच आधार कार्डच्या मदतीने आपण अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो. मग ते पॅनकार्ड काढणे असो वा आयटी रिटर्न भरणे असो या योजनांचा लाभ घेण्यासाठीही आपणाला आधार कार्ड महत्त्वाचे आहे.
मात्र, याच आधार कार्डचा दुरुपयोग करतात अनेक घोटाळेबाज, सायबर क्राईम करणारे आपली फसवणूक करू शकतात. ही फसवणूक टाळण्यासाठी आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नागरिकांना आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करण्याची सुविधा दिली आहे.
माहिती पुढीलप्रमाणे -
आपणाला जेव्हा आधार कार्डची गरज आहे त्या वेळेस आधार कार्ड अनलॉक करून आपण त्याचा वापर करू शकतो. जेव्हा आपल्याला गरज नसेल तेव्हा ते लॉक करून सुरक्षित ठेवू शकतो. ही सुविधा स्वतः UIDA ने दिली असल्याने आधारकार्डद्वारे केली जाणारी आपली फसवणूक कोणीही करू शकणार नाही.
कसे कराल कार्ड लॉक आणि अनलॉक:
आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करण्यासाठी पहिल्यांदा 'My Aadhar' या वेबसाईटवरील आधार सेवा (Adhaar services>) या ऑप्शन वरती क्लिक करावं लागेल या विभागात जाताच आपणाला या पेजवरती थोड स्क्रोल केल्यानंतर आधार लॉक आणि अनब्लॉक
(Adhaar Lock/Unlock>)
असा पर्याय येतो त्यानंतर आपणाला 'लॉक UID' वर क्लिक करा. यानंतर तिथे जे कार्ड लॉक करावयाचे आहे त्या आधार कार्डचा 12 अंकी क्रमांक टाका.
हे देखील पहा -
त्यानंतर पेजवरती विचारली जाणारी माहिती भरा जे की आपले संपुर्ण नाव, पिनकोड. त्यानंतर आपली माहिती बरोबर आहे याची एकदा शहानिशा करा ते चेक करण्यासाठी सुरक्षा कोड वापरा. सुरक्षा कोड एंटर (Enter Security Code) केल्यानंतर, तुम्हाला OTP आणि TOTP यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवरती पाठवलेला OTP एंटर करा दरम्यान तुमचा आधार लिंक केलेला नंबर तिथे प्रविष्ट केला जाईल. आणि तुमचे आधार कार्ड लॉक किंवा अनलॉक होईल अशाप्राकार तुम्ही तुमचे आधारकार्ड सुरक्षित ठेवू शकता दरम्यान माहितीसाठी तुम्ही uidai.gov.in ला भेट देऊ शकता, शिवाय आपणाला My Adhaar या पेजवरती आणखी भरपूर माहिती दिली आहे ती देखील पाहू शकता.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.