Fridge Cooling Tips Saam tv
लाईफस्टाईल

Fridge Cooling Tips : फ्रीजचे कुलिंग व्यवस्थित होत नाहीये ? या 5 गोष्टींवर वेळीच द्या लक्ष

5 Way To Help Your Fridge Cooling : उन्हाळ्यात रेफ्रिजरेटरमधला थंडपणा टिकवून ठेवायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

कोमल दामुद्रे

Fridge Cooling Tips Summer Season : उन्हाळा म्हटलं की, आपल्याला अधिक गरम होते. अशावेळी हवा असतो तो गारवा. कडाक्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण कूलर व एसीचा वापर करतो. आपल्या घरात २४ तास सतत काही सुरु असेल तर ते फ्रीज.

फ्रीजच्या वापर आपल्या दैनंदिन जीवनात अधिक वेळा (Time) होतो. किचनच्या सामानापासून ते एखादा पदार्थ घरात अधिक काळ (Long Time) टिकवण्यापर्यंत. परंतु, बरेचदा हा फ्रीज व्यवस्थितरित्या चालत नाही. उन्हाळ्यात रेफ्रिजरेटर नीट चालवायचा असेल आणि त्यातला थंडपणा टिकवून ठेवायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी (Care) घ्यावी लागेल. जाणून घेऊया त्याबद्दल

1. स्वच्छ ठेवा:

फ्रीज जर अधिक काळ टिकवायाचा असेल तर तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागेल. फ्रीजमध्ये सतत घाण साचत राहिल्यास ते खराब होण्याची शक्यता अधिक असते. फ्रीज नवीन असल्यास घाण ही कॉइल्सच्या तळाशी, ग्रिलच्या मागे असते. तसेच ते नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये, बाहेरील कॉइलमध्ये धूळ साचते.

2. बंद ठेवा:

उन्हाळ्याच्या काळात अधिक गरम होऊ लागले की, मुलं अनेक वेळा फ्रीज उघडू लागतात. सतत थंड पाणी पिणे किंवा आइस्क्रीम खाण्यासाठी त्याचा उपक्रम सुरु असतो. अशावेळी रेफ्रिजरेटर वारंवार उघडल्याने त्याचे तापमान कमी होते. ज्यामुळे त्याच्यात असणारा थंडपणा कमी होत जातो.

3. फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी या गोष्टी थंड करा :

बरेचदा असे होते की, आपण फ्रीजमध्ये गरम अन्नपदार्थ ठेवतो. असे केल्याने तुमचे पदार्थ तर थंड होतील. पण जेव्हा ते थंड करण्याची वेळ येते तेव्हा फ्रीजला अधिक मेहनत घ्यावी लागते.

4. फ्रीजमध्ये अधिक सामान ठेवा:

तुम्हाला हे ऐकून विचित्र वाटेल की, फ्रिजमध्ये जास्त सामान ठेवा. फ्रीजमध्ये जितक्या जास्त गोष्टी असतील तितके फ्रीज चांगले चालेल. याशिवाय फ्रीजच्या गॅसकडेही लक्ष द्यावे. जर तुम्हाला कधी वाटत असेल की रेफ्रिजरेटरचा गॅस संपत आहे किंवा खराब होत आहे तर वेळीच दुरुस्ती करा.

5. भिंतीपासून काही अंतरावर ठेवा:

फ्रीज नेहमी भिंतीपासून दूर ठेवावा. त्यामुळे फ्रीजमधून येणारी उष्णता सहज निघून जाते. रेफ्रिजरेटर भिंतीला चिकटून ठेवल्यास रेफ्रिजरेटरची उष्णता नीट बाहेर पडू शकत नाही आणि रेफ्रिजरेटर खराब होण्याची शक्यता असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Department Recruitment: सार्वजनिक आरोग्य विभागात सर्वात मोठी भरती! १४४० पदांसाठी रिक्त जागा; पगार १.७७ लाख; आजच अर्ज करा

Maharashtra Live News Update: भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच खेडमध्ये जंगी स्वागत

IIT Research Diabetes : मधुमेहिंसाठी आशेचा किरण! किडणी विकाराचे आता लवकर निदान होणार | VIDEO

Comet AI ब्राउझरला धक्का! Amazon ने Perplexity ला फीचर थांबवण्याची दिली नोटीस

विरारचा प्रवास वेगात होणार, निवडणुकीआधी सरकारने घेतला मोठा निर्णय, मुंबईसह पुण्यासाठी महत्त्वाची घोषणा

SCROLL FOR NEXT