Power Nap or Health Risk google
लाईफस्टाईल

Afternoon Sleep: दुपारची झोप घेणं शरीरासाठी फायदेशीर की घातक? तज्ज्ञांनी नेमका काय सल्ला दिला?

Afternoon Nap: दुपारची झोप शरीरासाठी फायदेशीर असते का? तज्ज्ञ सांगतात योग्य वेळ, नियम आणि त्याचे आरोग्यावर होणारे फायदे, तोटे, योग्य सवयी आणि टिप्स जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

दुपारच्या जेवणानंतर छान २ तासांची झोप घेणे, ही अनेकांची सवय असते. विशेषत: गृहीणी घरातली सगळी कामे आटोपून दुपारची घेणं जास्त पसंत करतात. काहींना दुपारच्या जेवणानंतर डुलक्या येऊ लागतात. काहींचे असे म्हणणे असते की, दुपारी झोपणे खूप महत्वाचे असते. काही लोक दुपारच्या झोपेला पॉवर नॅप म्हणतात, तर काही लोक ही झोप शरीरासाठी हानिकारक असल्याचे म्हणतात. पुढे आपण याबद्दल तज्ज्ञांचे म्हणणे जाणून घेणार आहोत.

तज्ज्ञांचे मत असे आहे की, दुपारची झोप शरीरासाठी फायदेशीर मानली जाते. तुम्ही जर २० ते ३० मिनिटे झोप घेत असाल तर थोड्या वेळासाठी मेंदूलाही आराम मिळतो. त्याने तुमची विचार करण्याची आणि एखाद्या गोष्टीवर फोकस करण्याची क्षमता वाढते. इतकेच नाहीतर दुपारी थोडा वेळ झोपल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल होतं आणि तणाव कमी होतो.

दुपारची झोपणे कोणत्या व्यक्तींनी टाळावे?

दुपारची झोप घेण्याचे काही नियम असतात. ते पाळून तुम्ही दुपारी झोपू शकता. पहिले म्हणजे दुपारची झोप घेताना जास्तीत जास्त १ तास घ्यावी. कारण यापेक्षा जास्त झोप घेतल्याने तुमची रात्रीची झोप खराब होऊ शकते. ज्या व्यक्तींना वारंवार कमी झोपेच्या त्रासाला सामोरे जावे लागत असेल त्यांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. शिवाय ज्या व्यक्तींना डायबिटीज, हार्ट संबंधीत प्रॉब्लेम्स असतील त्यांनी सुद्धा लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच दुपारची झोप घेताना तुम्हाला १ ते ३ या मधल्या वेळेत घ्यावी. तुम्ही जर जास्त तास झोप घेत असाल तर तुमच्या शरीरावर याचा उलट परिणाम दिसू शकतो.

झोपल्याने शरीराला आणि मेंदूला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही रात्री ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. मात्र काहींना कमी झोपेची सवय झालेली असते. काहींना झोपेत सतत जाग येत असते. त्यामुळे झोपेच्या अभावावर त्याचा परिणाम जाणवू लागतो. जर तुम्हाला झोपेच्या समस्यांचा खूप त्रास जाणवत असेल तर तुम्ही योगासने नियमित केली पाहिजेत. त्यामध्ये बलासन, शवासन, अनुलोम-विलोम आणि भ्रामरी प्राणायम केले पाहिजेत. तसेच झोपेच्या १ तासा आधी मोबाईल वापरणे टाळा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

SCROLL FOR NEXT