लाईफस्टाईल

Bathing Tips: घामाच्या वासाने त्रास होतोय? आंघोळीसाठी पाण्यात मिसळा 'या' वस्तू, करा घरगुती उपाय

Home Remedies: उन्हाळ्यात घामाच्या वासामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी, आंघोळीच्या पाण्यात काही पदार्थ मिसळून वापरल्यास तुम्हाला ताजगी आणि आराम मिळू शकतो.

Dhanshri Shintre

एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर सूर्याचे तापमान वाढू लागले आहे, ज्यामुळे घामाचा त्रास वाढला आहे. कडक उन्हामुळे शरीरातून दुर्गंधी येऊ लागते, ज्यामुळे लोक लाजीरवाणे होतात. जर तुम्हीही यामुळे त्रस्त असाल, तर आंघोळीच्या पाण्यात काही खास गोष्टी मिसळून तुम्ही घामाच्या वासापासून सुटका मिळवू शकता. आम्ही तुम्हाला घामाच्या वासाशी संबंधित काही प्रभावी उपाय सांगणार आहोत.

कोरफडीचे जेल

जर तुमच्याकडे कोरफडीचे रोप असेल, तर आंघोळीच्या पाण्यात कोरफडीचे जेल मिसळा. हे पाणी वापरल्याने शरीरावरील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि त्वचेला थंडावा मिळतो. यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि घामाचा वासही कमी होईल, असे कोरफडीचे पाणी तुम्हाला आरामदायक अनुभव देईल.

गुलाबपाणी

घामाच्या वासापासून आराम मिळवण्यासाठी, आंघोळीच्या पाण्यात दोन ते तीन चमचे गुलाबपाणी मिसळा. हे पाणी रोज आंघोळीसाठी वापरा. गुलाबपाणीामुळे तुमचं शरीर ताजे राहील आणि घामाचा वास दूर होईल. यामुळे तुम्हाला ताजगी आणि आराम मिळेल.

कडुलिंबाची पाने

घामाच्या वासापासून मुक्ती मिळवण्यासाठी, आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने उकळून मिसळा. एक भांडे पाणी घेऊन त्यात कडुलिंबाची पाने घाला, उकळा आणि थंड झाल्यावर गाळून पाणी आंघोळीच्या पाण्यात मिसळा. या पद्धतीने तुम्ही घामाच्या वासाशी संबंधित समस्या दूर करू शकता.

बेकिंग सोडा

घामाच्या वासापासून मुक्ती मिळवण्यासाठी, घरात सहज उपलब्ध असलेला बेकिंग सोडा वापरू शकता. आंघोळीच्या पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा मिसळा आणि नंतर त्या पाण्याने आंघोळ करा. मात्र, वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा, कारण सर्वांना बेकिंग सोडा योग्य नसेल. त्याचा वापर अ‍ॅलर्जी निर्माण करू शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक वापरा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT