Breastfeeding when mother is sick saam tv
लाईफस्टाईल

Sick mother and baby: आजारी असताना मातेने बाळाला स्तनपान करणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?

Breastfeeding when mother is sick: जेव्हा आई आजारी असते, तेव्हा अनेकदा तिच्या मनात एक प्रश्न येतो की, या परिस्थितीत बाळाला स्तनपान देणे सुरक्षित आहे की नाही? आजारी असताना दूध पाजल्याने बाळाला संसर्ग तर होणार नाही ना, अशी भीती अनेक मातांना वाटते.

Surabhi Jayashree Jagdish

स्तनपान हे बाळासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. पण जेव्हा आई आजारी असते किंवा औषधं घेत असते, तेव्हा अनेक मातांना भीती वाटते की, अशा वेळी स्तनपान करणं सुरक्षित आहे का? तज्ज्ञ सांगतात आहेत की, आजारी असतानाही स्तनपान सुरू ठेवणे किती आवश्यक आहे. स्तनपान सुरक्षित आहे आणि बाळाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अँटीबॉडीज मिळतात. त्यामुळे नवमातांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला स्तनपान देत राहावे.

आजारी असताना स्तनपान का महत्वाचे आहे?

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आदिती सिंगही सांगतात की, स्तनपानामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, संसर्गापासून संरक्षण मिळते, मेंदूचा विकास चांगला होतो आणि योग्य पोषण मिळतं. पण जेव्हा आई आजारी पडते, तेव्हा तिला शंका येते की अशा वेळी स्तनपान चालू ठेवावे का? मात्र बहुतेक आजारांमध्ये स्तनपान सुरू ठेवणं सुरक्षित आणि आवश्यक असतं. आईच्या दूधात येणारे अँटीबॉडीज बाळाला आजारांपासून वाचवतात.

आजारी असताना स्तनपान कधी सुरक्षित असते?

सर्दी, ताप, फ्लू, अतिसार यांसारख्या सौम्य आजारांमुळे आईचे दूध दूषित होत नाही. उलट अशा वेळी दूधामध्ये बाळाला आजारांपासून वाचवणारी अँटीबॉडीज तयार होतात. बर्‍याच वेळा आई औषध घेत असली तरी ती औषधं स्तनपान करताना सुरक्षित असतात. पण कोणतंही औषध घेताना नेहमी डॉक्टर किंवा लॅक्टेशन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांचा सल्ला न घेता स्तनपान थांबवू नका.

कोलस्ट्रम आणि आईचं दूध इतकं प्रभावी का असतं?

जन्मानंतर पहिल्या काही दिवसात येणारं दूध, म्हणजेच कोलस्ट्रम, हे पिवळसर, घट्ट असते आणि त्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. हे बाळासाठी लससमान काम करतं. स्तनपान सुरू ठेवलं तर आईच्या शरीरात तिच्या आजारांप्रमाणे अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या बाळालाही मिळतात ज्यामुळे बाळ लवकर बरं होतं.

स्तनपानाचे फायदे

  • स्तनपानामुळे बाळाला बालपणातील संसर्ग, अ‍ॅलर्जी आणि पुढे जाऊन लठ्ठपणा, डायबिटीस यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळते.

  • मेंदूचा विकास चांगला होतो आणि आई बाळात एक घट्ट नातं तयार होतं.

  • आईसाठीही हे फायदेशीर आहे. यामुळे स्तनाचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

स्तनपानाविषयी गैरसमज

  • दूध कमी येतं- जर दूध कमी येत असेल, तर वारंवार स्तनपान केल्याने दूध वाढतं. लॅक्टेशन तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

  • साधा आहार घेत असताना स्तनपान शक्य आहे का? हो, शरीर स्वतःहून बाळासाठी आवश्यक पोषण तयार करतं.

  • स्तनपानाची मर्यादा आहे का? जागतिक आरोग्य संघटनेनुसार, स्तनपान दोन वर्षांपर्यंत सुरू ठेवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope : 10 ते 15 ऑगस्टपर्यंत बारा राशींचे संपूर्ण राशी, वाचा फक्त एका क्लिकवर

Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Box Office: शनिवारी 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी; 'सैयारा', 'सन ऑफ सरदार २'ने केली कमाई

Mumbai: खबरदार! कबुतरांना दाणे टाकाल तर भरावा लागेल ५०० रुपयांचा दंड, मुंबई महानगर पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये

SCROLL FOR NEXT