Pooping 3 Times a Day Normal saam tv
लाईफस्टाईल

Pooping 3 Times a Day Normal: दिवसातून ३ वेळा शौचास जाणं घातक? जाणून घ्या किती वेळा टॉयलेटला गेलं पाहिजे!

How Many Times to Poop Daily: बहुतेक लोक दिवसातून फक्त एकदाच शौचास जातात, तर काही लोक दिवसातून २ ते ३ वेळा शौचास जातात. मात्र २ पेक्षा जास्त वेळा शौचास जाणं योग्य आहे का?

Surabhi Jayashree Jagdish

सकाळी उठल्यावर शौचाला जाणं आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. सकाळी शौचाला गेल्यानंतर तुमचा उर्वरित दिवस चांगला जातो आणि इतर आजारही मागे लागत नाहीत. अधिकतर लोकं सकाळी उठल्याबरोबर, फ्रेश होण्यासाठी म्हणजेच शौचास जाण्यासाठी जातात. काही लोक दिवसातून फक्त एकदाच शौचास जातात, तर काही लोक दिवसातून २ ते ३ वेळा शौचास जाण्यासाठी शौचालयात जातात.

पण तुम्हाला माहिती आहे का एखाद्या व्यक्तीने दिवसातून किती वेळा शौचास जावं? कमी-जास्त प्रमाणात शौचास जाणं हे शरीरासाठी चांगलं लक्षण मानलं जातं नाही. दिवसातून ३ वेळा शौचास जाणे योग्य आहे की नाही हे आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेऊया.

किती वेळा शौचाला जाणं योग्य?

बहुतेक लोक २४ तासांतून फक्त एकदाच शौचास जातात. काही लोक २ ते ३ वेळा शौचास जातात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, २ ते ३ वेळा शौचास जाणं सामान्य आहे. जर तुम्ही ३ पेक्षा जास्त वेळा शौचास गेलात तर तुम्हाला अतिसार होऊ शकतो. जर तुम्हाला वारंवार शौचास जाण्याची समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

एक वेळ निश्चित करा

शरीराला दररोज एकाच वेळी शौचास जाण्याची सवय लावणं पचनसंस्थेसाठी खूप चांगलं आहे. दररोज एकाच वेळी शौचास जाण्याने पचनसंस्था निरोगी राहू शकते. यामुळे तुम्हाला आजार होण्याचा धोकाही कमी होतो.

पचनतंत्राला मजबूत कसं करावं?

तुमच्या पचनसंस्थेला मजबूत करायचं असेल तर तुमच्या आहारात फायबरचा समावेश करा. यामध्ये तुम्ही फायबरयुक्त आहारासाठी फळं, भाज्या, शेंगा आणि संपूर्ण धान्य खावू शकता.

पाण्याचं सेवन

जास्त प्रमाणात पाणी पिणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. तसंच जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने मल मऊ होऊन शौचादरम्यान त्रास होत नाही. त्यामुळे दिवसातून कमीत कमी ८-१० ग्लास पाणी प्यायलं पाहिजे.

प्रोबायोटीक्स

याशिवाय तुमची पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठी दही, ताक इत्यादी प्रोबायोटिक्सचे सेवन करा.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यमुना नदीचं पाणी घरात शिरलं - मथुरा

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

SCROLL FOR NEXT