Chest Pain saam tv
लाईफस्टाईल

Chest Pain: हार्ट अटॅक अन् जळजळ यातला फरक कसा ओळखायचा? तज्ज्ञांनी सांगितली संपूर्ण लक्षणे

Heart Attack: छातीत दुखणे हे हार्ट अटॅकचे लक्षण आहे की फक्त गॅसचा त्रास? तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून जाणून घ्या लक्षणांचा फरक आणि गंभीरतेची खरी माहिती.

Sakshi Sunil Jadhav

सध्या हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत चालले आहे. यामध्ये तरुणांनाचा समावेश मोठ्या प्रमाणात होत आहे. याचे मुळ कारण म्हणजे सध्याची बदलती जीवनशैली. लोक त्यांच्या कामानुसार त्यांच्या खाण्यापिण्याच्या झोपेच्या वेळाही बदलायला सुरुवात करत आहेत. त्यामुळे अपचन, गॅस किंवा फूड पॉइजन अशा समस्या उद्भवत आहेत. त्यातील एक गंभीर बाब म्हणजे अनेकांना गॅस ही समस्या सामान्य वाटते. मात्र त्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक सारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते. याची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढील बातमीत मिळेल.

छातीमध्ये होणाऱ्या वेदना बहुतेक लोकांना हार्ट अटॅकच्या समस्या वाटतात. पण बऱ्याचदा हा त्रास गॅस किंवा अपचनामुळेही होऊ शकतो. यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि लोक घाबरायला लागतात. हार्ट अटॅक आणि गॅस यातील लक्षणे काही प्रमाणात सारखी असतात. मात्र त्यामागील कारणं व धोका पूर्णपणे वेगळा असतो. त्यामध्ये जर हार्ट अटॅक असेल तर छातीत तीव्र दाब आल्यासारखे वाटते, जडपणा किंवा दम भरल्यासारखे वाटतो. हा त्रास छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला होत असतो.

हार्ट अटॅकच्या लक्षणांमध्ये तोंड, घसा, मान, खांदे, पाठीपर्यंत याचे दुखणे पसरते. ही वेदना दिर्घतकाळ राहते. जी अचानक कोणत्याही कारणाशिवाय सुरू होते. याच्या वेदना आपसूक वाढत असतात. आराम मिळत नाही. हार्ट अटॅकसोबत श्वास घेण्यास त्रास, दम्याचा त्रास, मळमळ, चक्कर येणे किंवा मृत्यूची भीती अशी लक्षणेही दिसतात.

याच्या उलट गॅस किंवा अपचनामुळे होणारी वेदना साधारणपणे जास्त असते. यामध्ये छातीत जळजळ किंवा टोचल्यासारखे वाटत असते. हा त्रास पोटाच्या वरच्या भागात किंवा छातीखाली जाणवतो. जेवणानंतर, जास्त गॅस होणारे पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा लवकर खाल्ल्यामुळे हवा गिळल्यावर ही समस्या वाढण्याची शक्यता असते. गॅस झाल्या असेल तर, वेदना कधी वाढते, कधी कमी होते आणि ढेकर दिल्यानंतर किंवा गॅस पास झाल्यानंतर आराम मिळतो. यासोबत पोट फुगणे, ढेकर येणे अशी लक्षणे दिसतात. मात्र, गॅसमध्ये घाम, चक्कर किंवा घाबरल्यासारखे क्वचितच जाणवते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळनंतर आता चिपळूणमध्येही टीडब्ल्यूजेच्या चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Face Care Tips: सॉफ्ट आणि ग्लोइंग स्किनसाठी सकाळी उठल्यावर चेहरा या घरातील सामग्रीने करा स्वच्छ, आठवड्याभरात दिसेल फरक

Cricket Shocking : क्रिकेट विश्वाला मोठा धक्का; टीम इंडियाच्या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड

Asia Cup : पाकिस्तान आशिया कपमधून बाहेर होणार, आकडेवारी सांगतेय कोण किती पाण्यात?

Wednesday Horoscope: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या राशीवर देवीचा विशेष आशीर्वाद; वाचा उद्याचे भविष्य

SCROLL FOR NEXT