Sakshi Sunil Jadhav
नवरात्रीत अनेकजण देवीची उपासना करतात. यावेळेस देवीच्या पुजेसोबत उपवास ठेवले जातात.
उपवासात काही फळ आहार, किंवा साबुदाण्याचा समावेश केला जातो. मात्र तुम्ही पुढील ६ ड्रिंक्सचा वापर करुन दिवसभर एनर्जेटिक राहू शकता.
नारळ पाणी रिफ्रेशिंग ड्रिंक आहे. तुम्ही हे रोज सकाळी किमान १ ग्लास प्यायला हवे.
उपवासाच्या दिवशी नुसती फळं खायला कंटाळला असाल तर केळी आणि बदामाचे मिल्क शेक करु शकता.
उपवासाच्या वेळी ताक हे उत्तम थंडगार पेय आहे. त्यामध्ये दही, पाणी, मीठ आणि पुदिन्याची पाने पूर्णपणे मिक्स करुन सेवन करा.
फ्रुट स्मुदीसाठी सफरचंद, पपई, डाळींब, मध आणि दही यांचे मिश्रण करुन तुम्ही थंड ड्रिंक्स टेस्टी पिऊ शकता.
उपवासात तुम्ही केशरचे दूध पिऊ शकता. त्यामध्ये ड्रायफ्रुट्सचा समावेश असावा.
तुम्हाला काही युनिक ट्राय करायचे असेल तर उपवासात बेलाच्या फळाचा रस सुद्धा उत्तम आहे.