drinking water while standing saam tv
लाईफस्टाईल

Water and joint pain: उभं राहून पाणी पिणं गुडघ्यांसाठी खरंच धोकादायक? आहारतज्ज्ञांनी दिली अचूक माहिती

Drinking water while standing myth: 'उभे राहून पाणी पिऊ नका, नाहीतर गुडघ्यांना त्रास होईल', हा सल्ला आपल्यापैकी अनेकांनी घरात मोठ्यांकडून ऐकलेला आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या धारणेवर अनेक आरोग्य तज्ञ आणि डायटिशियन वेगवेगळी मते मांडतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • उभं राहून पाणी पिणे सांध्यांना हानिकारक असू शकते.

  • वैज्ञानिक पुराव्याशिवाय हा समज चुकीचा आहे.

  • पाणी वेगाने पोटात जाऊन पचनावर परिणाम करते.

आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत की, पाणी कधीही उभं राहून प्यायचं नाही. उभं राहून पाणी प्यायल्याने गुडघ्यांना आणि सांध्यांना त्रास होतो, म्हणून बसूनच पाणी प्यावं असं सांगितलं जातं. पण खरंच यामध्ये किती तथ्य आहे?

डायटिशियन जुही अरोरा यांनी शेअर केलेल्या एका रीलमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा समज चुकीचा आहे. पाणी आपण उभं राहून प्यायलं किंवा बसून प्यायलं तर ते अन्ननलिकेतून थेट पोटात जातं. त्यामुळे गुडघ्यांवर किंवा सांध्यांवर त्याचा थेट काहीही परिणाम होत नाही.

त्यांनी स्पष्ट केलं की, "उभं राहून पाणी प्यायल्याने गुडघ्यांना त्रास होतो हा एक गैरसमज आहे. वैज्ञानिक दृष्ट्या अशा प्रकारचं कोणतंही पुरावं उपलब्ध नाही. हो, काही लोकांच्या मते उभं राहून पाणी प्यायल्याने ते पटकन पोटात जातं आणि त्यामुळे कधी कधी अपचन किंवा पोटात जडपणा जाणवू शकतो. पण याचा सांध्यांशी काहीही संबंध नाही."

उभं राहून पाणी प्यायल्याचे दुष्परिणाम

अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. विपुल रुस्गी यांनी हेल्थशॉट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, उभं राहून पाणी पिणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.

उभं राहून पाणी प्यायल्याने काय त्रास होतो तो पाहूयात-

  • उभं राहून पाणी प्यायल्यावर ते वेगाने अन्ननलिकेतून पोटात जातं आणि त्यामुळे पचनक्रियेत अडथळे निर्माण होतात.

  • पाणी पटकन पोटात गेल्यामुळे शरीरातील स्नायूंवर ताण येतो, द्रवांचा समतोल बिघडतो आणि हळूहळू सांध्यांमध्ये द्रव साचू लागतो. यामुळे पुढे जाऊन संधिवाताची समस्या होऊ शकते.

  • उभं राहून पाणी प्यायल्याने आवश्यक पोषणद्रव्यं आणि जीवनसत्त्वं यकृत आणि पचनसंस्थेपर्यंत नीट पोहोचत नाहीत.

  • उभं राहून पाणी प्यायल्याने ते पोटातून थेट मूत्राशयात वेगाने पोहोचतं, त्यामुळे पाण्यातील अशुद्धी गाळली जात नाही आणि दीर्घकाळाने मूत्रपिंडाच्या कार्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

उभं राहून पाणी प्यायल्याने गुडघ्यांना त्रास होतो का?

वैज्ञानिकदृष्ट्या याचा सांध्यांशी संबंध नाही, पण अपचनाचा त्रास होऊ शकतो.

उभ्याने पाणी पिण्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो?

पाणी वेगाने पोटात जाऊन पचनात अडथळे निर्माण होतात.

उभं राहून पाणी पिण्याने मूत्रपिंडांवर कसा परिणाम होतो?

पाण्यातील अशुद्धी गाळली न गेल्याने मूत्रपिंडांवर दीर्घकाळाने ताण पडतो.

उभ्याने पाणी पिण्याने शरीरात कोणता समतोल बिघडतो?

शरीरातील द्रव आणि स्नायूंचा समतोल बिघडतो.

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

शांतपणे बसून हळूहळू पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगले आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Devices: IPhone 17 लॉंच होताच, बंद होणार अ‍ॅप्पलचे 'हे' डिव्हाईस

पठाणकोटमध्ये २५ जवानांना कसं वाचवलं; अंगावर शहारे आणणारं रेस्क्यू ऑपरेशन | VIDEO

Shocking: भयंकर! तरुणाच्या गुद्दद्वारात अडकला पाईपचा तुकडा; एक्स-रे काढल्यानंतर डॉक्टरही चक्रावले

Horoscope Thursday : ५ राशींच्या वाटेतली विघ्न दूर होणार, स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणार; वाचा गुरुवारचे खास राशीभविष्य

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग बाईकचा थरार

SCROLL FOR NEXT