Copper bottle SAAM TV
लाईफस्टाईल

Copper bottle: तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? पाहा नेमकी कशी वापरावी ही बाटली?

how to use copper bottle: आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते पिणे ही जुनी परंपरा आहे. आजही अनेक लोक तांब्याच्या बाटलीतले पाणी पितात आणि त्याचे आरोग्य फायदे मानले जातात.

Surabhi Jayashree Jagdish

सध्याच्या काळात प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेतो. अशातच आता पुन्हा प्राचीन काळात आरोग्य पद्धती पुन्हा लोकप्रिय होताना दिसतायत. त्यापैकी एक म्हणजे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं. आयुर्वेदात रुजलेली ही परंपरा अनेक आरोग्यदायी फायदे देते असं मानण्यात येतं. मात्र यामागे खरंच वैज्ञानिक आधार आहे का आणि हे दररोज वापरणं सुरक्षित आहे का? हे जाणून घेऊया

काय आहे याचा इतिहास आणि उगम

तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून पिण्याची प्रथा प्राचीन भारत आणि इजिप्तमध्ये आढळते. आयुर्वेदात याला ताम्रजल असं म्हटलं जातं. अशी मान्यता आहे की, ताम्रजल तीन दोष म्हणेजच वात, पित्त आणि कफ संतुलित करते. यामुळे तुमचं शरीर शुद्ध होतं आणि एकूणच ऊर्जा आणि ताजेतवानेपणा वाढतो.

तांब्याचे घटक पाण्यात कसा मिसळतो?

जेव्हा पाणी तांब्याच्या भांड्यात 6–8 तास किंवा रात्रभर ठेवलं जातं त्यावेळी सूक्ष्म तांब्याचे घटक पाण्यात विरघळतात. या प्रक्रियेला ओलिगोडायनॅमिक इफेक्ट म्हटलं जातं. ज्यामध्ये तांब्यासारखे सूक्ष्म धातू जीवाणू आणि विषाणूंवर निर्जंतुकीकरणाचा प्रभाव टाकतात.

संभाव्य आरोग्य फायदे

प्रतिरोधक शक्ती वाढवतं

तांब्यामध्ये antimicrobial, anti-inflammatory आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. जे संसर्ग आणि सूज कमी करण्यात मदत करतात.

पचन सुधारतं

तांबं हे हानिकारक जीवाणू नष्ट करण्यात आणि पोटातील सूज कमी करण्यात मदत करतो. त्यामुळे अल्सर, अपचन आणि संसर्ग टाळण्यासाठी उपयुक्त ठरतो.

वजन कमी करण्यात मदत

तांब्याचं पाणी चरबीचं प्रमाण कमी करतो. परिणामी ती शरीरातून बाहेर टाकण्यास मदत होते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.

त्वचेचं आरोग्य सुधारतं

तांबे मेलानिन तयार करण्यात मदत करतो ज्यामुळे skin regeneration होण्यास मदत होते. यामुळे त्वचेवर असणारे डाग देखील कमी होतात.

थायरॉईड कार्य नियंत्रित करतं

तांबं थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी आवश्यक आहे. त्याची कमतरता झाल्यास असंतुलन निर्माण होऊ शकतं.

तांब्याची बाटली सुरक्षित पद्धतीने कशी वापरावी?

  • बाटलीत स्वच्छ, फिल्टर केलेलं पाणी भरून ते रात्रभर किंवा किमान 6 तास ठेवा.

  • सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या.

  • दिवसातून एक–दोन वेळाच वापरा, जास्त वापर टाळा.

  • लिंबूपाणी किंवा इतर आम्लयुक्त द्रव यात ठेवू नका. कारण त्यामुळे रासानिक प्रक्रिया होते.

  • बाटली नियमितपणे लिंबू आणि मीठाने स्वच्छ करा. ज्यामुळे ऑक्सिडेशन टळेल आणि स्वच्छता राखली जाणार आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Internship: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! रिझर्व्ह बँकेत इंटर्नशिपची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Maharashtra Live News Update: पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील यांच्यातील वाद संपुष्टात

Municipal Election : पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागणार? वाचा महापालिका निवडणुकीचे अपडेट

MSRTC Tours: लाल परी, लय भारी; पॅकेज टूरने एसटी झाली मालामाल, किती कमावले?

Maharashtra Winter Assembly: विधीमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद

SCROLL FOR NEXT