मुंबई : बऱ्याचवेळा महिला (Womens) शरीरसंबंध ठेवल्यानंतर चिंतेत असतात. लग्न झाल्यानंतर लवकर बाळ नको असल्यामुळे ते गर्भनिरोधक गोळीचे सेवन करतात. (advantage and disadvantage of emergency contraceptive pills)
हे देखील पहा -
शरीरसंबंध ठेवताना कंडोमला पर्याय म्हणून बऱ्याच स्त्रिया ह्या गर्भनिरोधक गोळीचे सेवन करतात पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होऊ शकतो यांचा त्यांना अंदाजा नसतो व त्यामुळे त्यांना अनेक विपरीत परिणाम भोगावे लागतात. शरीरसंबंध ठेवल्यानंतर गर्भधारणा रोखण्यासाठी या गोळीचा वापर केला जातो पण त्याचा खरच योग्य तो परिणाम होतो का ? हे आपण जाणून घेऊया. (How the birth control pill works?)
आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या काम कसे करते ?
शरीरसंबंध ठेवल्यानंतर महिलांनी ७२ तासांच्या आत या गोळीचे (Medicine) सेवन करायला हवे. या गोळ्या गर्भधारणा रोखण्याचे काम करतात. जर ही गोळी घेण्यास अधिक वेळ लावला तर गर्भ राहण्याचा धोका वाढू शकतो.
गोळीचे कार्य कसे असते ?
गर्भधारणेसाठी ओव्हुलेशनच्या आत असणाऱ्या अंड्यांना शुक्राणूंना जेव्हा एकमेकांना मिळाल्यानंतर गर्भधारणा होते. या गोळ्या शुक्राणूना थांबवण्याचे काम करते त्यामुळे गर्भ राहत नाही. या गोळ्या शरीरसंबंध ठेवल्यानंतर घेतल्या जातात. काही गोळ्या या १२० तास पर्यंत सुरक्षितता देतात तर काहींचा कालावधी हा ७२ तासापर्यंत असतो.
कायमस्वरूपी याचा वापर करू शकतो का ?
शरीरसंबंध ठेवल्यानंतर सतत गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करणे चुकीचे ठरेल त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या किडनीवर होऊ शकतो. तसेच गर्भनिरोधकांसाठी कंडोमचा वापरही पर्यायी ठरु शकेल.
सतत घेतल्याने काय होईल ?
या गोळ्यांचा वापर आपण कधीतरी करु शकतो. परंतु, सतत घेत्याने त्याच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. सतत घेतल्याने शरीरात अनेक हार्मोन्सची निर्मिती होते. याचा अतिवापर केल्यामुळे मासिक पाळीची समस्या, योनिमार्गाची समस्या व त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे आपली मासिक पाळी येण्याची वेळ देखील बदली जाते. यासाठी याचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.(Birth Control Pill side effects)
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.