Tour Plan
Tour Plan Saam Tv
लाईफस्टाईल

IRCTC MP Tour Plan: मध्य प्रदेशमध्ये फिरण्याची जबरदस्त संधी! IRCTC चा नवीन टूर प्लान, बुकिंग खर्च पाहा

कोमल दामुद्रे

IRCTC Tour Package For Maheshwar, Indore, Ujjain:

मध्य प्रदेशला भारताचे हृदय म्हणून ओळखले जाते. मध्य प्रदेश एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला निसर्गसौंदर्य पाहाता येते. जर एप्रिल महिन्यात तुम्ही फिरण्याचा प्लान करत असाल तर मध्य प्रदेशमध्ये फिरु शकता.

IRCTC ने तुमच्यासाठी जबरदस्त संधी आणली आहे. यामध्ये तुम्हाला अनेक पर्यटनस्थळांना भेट देता येईल. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरण्याचा प्लान करु शकता. जाणून घेऊया बुकिंग खर्च (Price) किती?

पॅकेजचे नाव - मध्य प्रदेश महादर्शन

पॅकेज कालावधी - ४ रात्री, ५ दिवस

प्रवास मोड - फ्लाइट (Flight)

फिरण्याची ठिकाणे - महेश्वर, ओंकारेश्वर, उज्जैन, इंदोर

कुठून जाल? - हैदराबाद

1. कोणत्या सुविधा मिळतील?

  • या टूर पॅकेजमध्ये राउंड ट्रिप फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासचे तिकीट तुम्हाला मिळेल.

  • तसेच राहाण्यासाठी हॉटेल सुविधा देखील मिळणार आहे.

  • या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता आणि रात्रीचे जेवणही मिळणार आहे.

  • तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा देखील मिळणार आहे.

2. बुकिंग खर्च किती?

तुम्ही सोलो ट्रिप करत असाल तर तुम्हाला ३३, ३५० रुपये मोजावे लागतील.

तर दोन लोकांना प्रति व्यक्ती २६,७०० रुपये मोजावे लागतील. तर फॅमिलीसाठी प्रति व्यक्तीला २५,६५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. जर तुमच्यासोबत लहान मुले असतील तर त्यासाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. यामध्ये तुम्ही २३,५५० रुपये द्यावे लागतील. बेडशिवाय २१, ४५० रुपये भरावे लागतील.

3. कसे कराल बुक?

पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. याशिवाय तुम्हाला IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Over Thinking: तुम्हाला पण सतत over thinking करायची सवय आहे? तर करा हे उपाय

Jalna Crime : मराठा आरक्षणासाठी मुलाने आत्महत्या केल्याचा बनाव; बापाच्या कृत्याने सारे हादरले, तपासात सत्य आले समोर

Sanjay Raut: महाराष्ट्रात ४ जूननंतर मोठ्या घडामोडी घडणार; संजय राऊत

Unseasonal Rain: संभाजीनगर, यवतमाळ, नागपूरसह बुलढाण्यात वादळी वा-यासह पाऊस, आंब्यासह फळभाज्यांचे नुकसान

Screen Time: तुम्हीही जास्त वेळ स्क्रीनसमोर बसता? जडतील हे आजार

SCROLL FOR NEXT