Assam IRCTC Tour Package, Assam And West Bengal IRCTC Tour Full Package, Booking Process Details in Marathi Saam Tv
लाईफस्टाईल

Darjeeling IRCTC Tour Package: उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरा दार्जिलिंग, IRCTC चा नवा टूर पॅकेज, बुकिंग खर्च किती?

West Bengal's Darjeeling, Gangtok IRCTC Tour Full Package, Booking Process Details in Marathi: IRCTC ने पर्यटकांना आसाम आणि पश्चिम बंगालची टूर पॅकेज दिली आहेत. तुम्हालाही फिरायला जायचे असेल तर जाणून घेऊया IRCTC च्या टूर पॅकेजबद्दल.

कोमल दामुद्रे

IRCTC Tour Plan for Darjeeling Explained in Marathi

उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकांना थंड हवेच्या ठिकाणी फिरायला आवडते. अशावेळी आपण माथेरान, महाबळेश्वर अशी ठिकाणी जातो. पण तिच तिच ठिकाणे फिरुन कंटाळा आला असेल तर आयआरसीटीसा उन्हाळी वेकेशन प्लान पाहा.

आरआयसीटीने हिमालयातील ठिकाणी फिरण्याची संधी पर्यटकप्रेमींना दिली आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना दार्जिलिंग, गंगटोक आणि कालिम्पाँगला भेट देता येणार आहे. हे टूर पॅकेज 'देखो अपना देश' च्या अंतर्गत सुरु करण्यात आले आहे.

IRCTC चा हा टूर पॅकेज जयपूरपासून सुरु होणार आहे. या टूर पॅकेजमधून तुम्ही स्वस्तात मस्त हिमालयातील पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता. यामध्ये पर्यटकांना राहाण्याची आणि खाण्याची सोय मिळणार आहे. IRCTC ने पर्यटकांना आसाम आणि पश्चिम बंगालची टूर पॅकेज दिली आहेत. तुम्हालाही फिरायला (Travel) जायचे असेल तर जाणून घेऊया IRCTC च्या टूर (Tour) पॅकेजबद्दल.

पॅकजचे नाव

Himalayas with our "Kalimpong - Gangtok - Darjeeling Ex Jaipur" package

पॅकेज कालावधी

५ रात्री आणि ६ दिवस

प्रवास

फ्लाइट मोड

कुठे फिरता येईल?

कालिम्पाँग, गंगटोक आणि दार्जिलिंग

प्रवास कधी ?

२९ एप्रिल, १४ मे, २१ मे, २८ मे आणि ४ जून

1. कोणत्या सुविधा मिळतील?

  • या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला राउंड ट्रिप फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासचे तिकीट मिळेल.

  • राहाण्यासाठी हॉटेलची सुविधा मिळणार आहे.

  • टूर पॅकेजमध्ये पर्यटक कालिम्पाँगमध्ये एक रात्र, गंगटोकमध्ये 2 रात्री आणि दार्जिलिंगमध्ये 2 रात्री राहतील.

  • या पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण मिळेल.

2. प्रवासाचा खर्च किती येईल?

  • या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला सोलो ट्रिप करायची असेल तर तुम्हाला ७१,६५० रुपये (Price) मोजावे लागतील.

  • कपल्स जाणार असाल तर प्रत्येक व्यक्तीला ५७,२५० रुपये द्यावे लागतील.

  • जर तुम्ही फॅमिली ट्रिप करत असाल तर प्रति व्यक्तीला ५४,३६५ रुपये भरावे लागतील. तर या टूर पॅकेजची सुरुवातीची किंमत 54,365 रुपये ठेवण्यात आली आहे.

3. बुकिंग प्रोसेस

या टूर पॅकेजसाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. याशिवाय तुम्हाला IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT