December Tour Package Saam Tv
लाईफस्टाईल

December Tour Package : IRCTC चा टूर धमाका! पार्टनरसोबत बजेटमध्ये फिरता येणार दार्जिलिंग-राजस्थान, बुकिंग कशी कराल?

Winter Travel Plan : डिसेंबर महिन्यात पार्टनरसोबत फिरायला जायचे असेल तर आयआरसीटीसीने नवा टूर प्लानला भेट देऊ शकता.

कोमल दामुद्रे

Rajasthan-Darjeeling Tour :

हिवाळा म्हटंल की, गुलाबी थंडी फिरण्याची मज्जा काही औरच! अनेक जण या ऋतूची आतुरतेने वाट पाहात असतात. रोजच्या ताणतणावाचं आयुष्य जगताना कुठे फिरायला जायचा प्लान करता.

हिवाळ्यात थंडगार वातावरणात बघून अनेकांना एखाद्या निसर्गरम्य वातावरणात फिरयला जायला आवडते. जर तुम्हालाही यंदाच्या हिवाळ्यात किंवा डिसेंबर महिन्यात पार्टनरसोबत फिरायला जायचे असेल तर आयआरसीटीसीने नवा टूर प्लानला भेट देऊ शकता. बुकिंग कसे कराल? जाणून घेऊया  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डिसेंबर महिन्यात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला भारतातील राजस्थान, दार्जिलिंग आणि गुजरात या पर्यटनस्थळांना भेट देता येणार आहे. हे पॅकेज टूर १२ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. यामध्ये उदयपूर, कुंभलगड आणि माउंट आबूचा प्रवास करता येणार आहे. हे टूर पॅकेज ४ रात्री ते ५ दिवसांचे असणार आहे. हे पॅकेज १७ डिसेंबरपर्यंत असणार आहे. हा प्रवास तुम्हाला दिल्लीवरुन विमानाने करता येणार आहे.

1. टूर पॅकेज किती?

कपल्स (Couple) ट्रॅवल (Travel) करत असाल तर प्रति व्यक्तीसाठी ३४,९०० रुपये मोजावे लागतील. तीन जणांसाठी तुम्हाला प्रति व्यक्तीसाठी ३७,७०० रुपये मोजावे लागणार आहे. जर तुम्हाला ही सोलो ट्रिप करायची असेल तर तुम्हाला ४८,१०० रुपये मोजावे लागतील. तसेच तुमच्या सोबत लहान मुले असतील तर ५ ते ११ वयोगटातील मुलांसाठी बेडसह भाडे ३२,६०० रुपये असेल तर बेडशिवाय ३१,९०० रुपये शुल्क असेल. याशिवाय २ ते ४ वयोगटातील मुलांसाठी प्रवासी शुल्क २५,९०० रुपये असणार आहे.

2. राजस्थान ते भोपाळ टूर पॅकेज

६ डिसेंबरपासून हे पॅकेज सुरु होईल. हे ९ दिवस ८ रात्रींसाठी असणार आहे. पॅकेजमध्ये फतेहपूर सिक्री, जयपूर, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर आणि उदयपूरला भेट देऊ शकता. सोलो ट्रिपला जाण्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्तीसाठी ५८ हजार ५०० रुपये भरावे लागतील. कपल्ससाठी ४२ हजार ९०० रुपये तर तीन प्रवाशांसाठी ४०,२०० रुपये खर्च येईल.

3. गंगटोक आणि दार्जिलिंग

५ रात्री ६ दिवसांसाठी हा टूर पॅकेज (Package) असणार आहे. ही टूर १ डिसेंबरपासून सुरु होईल. या टूरमार्फत तुम्ही दार्जिलिंग, गंगटोक आणि कालिम्पाँगला भेट देऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT